बहिणीला सोडवायला आला होता पण नंतर जीवाशीच गेला…कारण आलं समोर जाणून धक्काच बसेल…
शव विच्छेदन अहवाल आल्यानंतर बहीणींच्या तक्रारीवरून देवळाली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दखल करण्यात आला होता, त्याबाबत देवळाली पोलीस तपास करत होते.
नाशिक : नाशिकच्या देवळाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत बहिणीला हिंगोलीवरुन सासरी सोडवायला आलेल्या भावाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. त्यानुसार देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात याबाबत खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. गणेश पठाडे असं मृत व्यक्तीचे नाव असून भगूर येथे त्याची बहीण राहत आहे. बहिणीला घरी सोडवायला आलेला भाऊ हा मुक्कामी होता. मोबाईलचा रीचार्ज संपला म्हणून तो घरच्या बाहेर गेला होता. मात्र, बऱ्याच वेळा फोन करूनही भावाचा संपर्क होत नसल्याने बहिणीने घरात ही माहिती दिली. भावाचा शोध सुरू झाला मात्र भाऊ मिळत नव्हता. असं असतांना नदीच्या किनारी अज्ञात व्यक्तीचा जखमी अवस्थेत तरुण आढळून आल्याची माहिती समोर आली, त्यामध्ये बहिणीने भावाला ओळखताच त्याला जवळच्या खाजगी रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र जिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला खाजगी डॉक्टरांनी दिला होता. त्यातच जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. शवविच्छेदन अहवालात मात्र धारधार आणि जड वस्तूने डोक्यात मारहाण केल्याची बाब अहवालात नमूद करण्यात आली होती.
शव विच्छेदन अहवाल आल्यानंतर बहीणींच्या तक्रारीवरून देवळाली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दखल करण्यात आला होता, त्याबाबत देवळाली पोलीस तपास करत होते.
खरंतर नाशिक शहरात घरफोड्या, दुचाकी चोरी, मारहाण आणि खुनाच्या घटना घडत असल्याने आधीच नागरिक भीतीच्या सावटाखाली वावरत आहे.
त्यातच नाशिकच्या भगुर हद्दीत पठाडे याच्या खुनाची घटना धक्कादायक होती, हिंगोलीच्या तरुणाचा नाशकात मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती.
गणेश पठाडे यांची हत्या कुणी केली ? हत्या किंवा मारहाण करण्यामागे काय कारण होते ? गणेश याचे नाशिकमध्ये कुणाशी वाद होते का ? असे विविध बाजूने पोलिसांना तपास करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
असे असतांना नाशिकच्या देवळाली पोलीसांनी अवघ्या 24 तासाच्या आत हत्येचा उलगडा केला असून सख्ख्या चुलतीलाच अश्लील मेसेज आणि व्हिडिओ पाठवत असल्याने सख्ख्या भावानेच मित्रांच्या मदतीने हत्या केल्याची बाब उघड झाली आहे.
गणेश नाशिकमध्ये पळून आल्याची माहिती संशयित गणेश याचा भाऊ अमोल पठाडे याला लागली होती, त्यानुसार अमोल याचे मित्र दानिश शेख, शादीक शेख, विवेक केदारे यांच्या मदतीने गणेशची हत्या करण्यात आली आहे.
मुख्य संशयित हा मयत व्यक्तीचा सख्खा चुलत भाऊ असल्याने या हत्येची जोरदार चर्चा होत असून चुलतीला अश्लील मेसेज पाठवल्याने खळबळ उडाली आहे.