पहाटेच्या सुमारास घराच्या मागील बाजूने प्रवेश केला, मग वृद्धासोबत जे घडले ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल !

वाढती गुन्हेगारी पाहता जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एकट्या वृद्धांना गाठून त्यांच्यावर हल्ले करुन लुटण्य्याचे प्रमाण वाढले आहे. अशीच एक घटना नागपुरातील हायप्रोफाईल परिसरात घडली आहे.

पहाटेच्या सुमारास घराच्या मागील बाजूने प्रवेश केला, मग वृद्धासोबत जे घडले ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल !
नागपुरात वृद्धाला लुटलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 05, 2023 | 4:45 PM

नागपूर / सुनील ढगे : घरात एकटे असल्याची संधी साधत घरात घुसून वृद्धाला मारहाण करुन लुटल्याची घटना नागपुरात हायप्रोफाईल कॉलनीत घडली. इंद्रप्रस्थ लेआऊट येथे धाडसी दरोडा टाकण्यात आला. एका 80 वर्षीय वयोवृध्दाला हातपाय बांधून जखमी करत 32 लाख रुपयाचा ऐवज घेऊन दरोडेखोर पसार झाले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. सुरेश पोटदुखे असं 80 वर्षीय व्यवसायिकांच नाव असून, त्यांचावर सध्या उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती ठीक असल्याच सांगितलं जातं आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी चार पथके तयार केली आहेत.

वृद्ध व्यक्ती घरात एकटेच राहतात

सुरेश पोटदुखे हे इंद्रप्रथ ले आउट येथे एकटेच राहतात. पोटदुखे यांचा मुलगा आणि पत्नी परदेशात राहतात. मंगळवारी पहाटे तीन अज्ञात दरोडेखोरांनी घराच्या मागील बाजूने प्रवेश केला. त्यानंतर घरात एकटेच असणारे सुरेश पोटदुखे यांना मारहाण करत हातपाय बांधले. लॉकरची चावी मागत त्यांना कमरेखाली चाकूने वार करत जखमी केले. त्यानंतर घरातील ऐवज आणि रोख असा 32 लाखाचा मुद्देमाल घेऊन पसार झाले.

सकाळी जखमी अवस्थेत दारावर आल्यानंतर घटना उघड

जखमी सुरेश पोटदुखे हे मंगळवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास शेजाऱ्यांना आवाज देत घराच्या दारावर आले. यानंतर ही घटना उघडकीस आली. शेजाऱ्यांनी सुरेश पोटदुखे यांना रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी सोनेगाव पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. सोनेगाव पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करत अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करत तपास सुरू केला आहे.

हे सुद्धा वाचा

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासत आरोपींचा शोध सुरू केला आहे. आरोपीच्या शोधासाठी चार पथकं बनविण्यात आले आहेत. मात्र या घटनेमुळे पुन्हा एकदा वृद्धांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.