चप्पल काढण्यावरुन दोन कुटुंबात वाद, वृद्धाला संपवून आरोपी फरार

चप्पल ठेवण्यावरुन झालेल्या क्षुल्लक वादातून दोन कुटुंबात हाणामारी झाली. या हाणामारीत एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना मीरा रोड परिसरात घडली आहे.

चप्पल काढण्यावरुन दोन कुटुंबात वाद, वृद्धाला संपवून आरोपी फरार
आई आणि मुलांचा संशयास्पद मृ्तयूImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 06, 2023 | 1:37 PM

मुंबई : फ्लॅटच्या बाहेर चप्पल काढण्यावरुन झालेल्या वादातून दोन कुटुंबात हाणामारी होऊन एका वृद्धाची हत्या केल्याची घटना मीरा रोड येथे घडली आहे. हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाला. अफसर खत्री असे हत्या करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी नया नगर पोलीस ठाण्यात कलम 302 नुसार हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत. पोलिसांनी आरोपीच्या पत्नीला ताब्यात घेतले आहे. समीर असे हत्या करुन फरार झालेल्या आरोपीचे नाव आहे.

चप्पल ठेवण्यावरुन झाला वाद

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील मीरा रोड येथील नया नगर संकुलात अस्मिता डॅफोडिल या इमारतीत ही घटना घडली. या इमारतीत अफसर खत्री यांचा फ्लॅट आहे. शनिवारी रात्री फ्लॅटच्या बाहेर चप्पल ठेवण्यावरून शेजारी राहणाऱ्या समीरसोबत त्यांचे भांडण झाले. क्षुल्लक कारणातून झालेला वाद इतका विकोपाला गेला की दोन्ही कुटुंबात हाणामारी झाली. यादरम्यान वृद्ध खत्री गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला.

मयताच्या पत्नीच्या फिर्यादीवरुन हत्येचा गु्न्हा दाखल

याप्रकरणी खत्री यांच्या पत्नीने नया नगर पोलीस ठाण्यात समीरविरुद्ध तक्रार दिली. महिलेच्या तक्रारीवरुन नया नगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आरोपी फरार झाला असून, पोलिसांनी त्याच्या पत्नीला ताब्यात घेत चौकशी सुरू आहे.

हे सुद्धा वाचा

आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी दोन पथकं तयार केली आहेत. पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत. आरोपीला पकडण्यासाठी पोलीस छापेमारी करत आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.