Titwala Murder : फोन लागत नाही म्हणून नातेवाईक स्टॉलवर बघायला गेले, रक्ताच्या थारोळ्यात आढळली वृद्ध महिला
अनुबाई शेलार या टिटवाळ्यातील घोटसई गावातील रहिवासी असून त्या एकट्याच राहतात. त्यांच्या पतीचे निधन झाले असून दोन मुली विवाहित आहेत. उदरनिर्वाहासाठी अनुबाई कल्याण मुरबाड महामार्गावर असलेल्या गोवेली येथे वडापावची टपरी चालवत होत्या.
कल्याण : अज्ञात कारणावरुन एका वृद्ध महिले (Old Women)ची गळा चिरुन हत्या (Murder) करण्यात आल्याची खळबळजनक घटना टिटवाळ्यात उघडकीस आली आहे. अनुबाई मंगल शेलार (55) असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. मयत महिला घोटसई गावातील रहिवासी असून ती वडापाव विकून उदरनिर्वाह करत होती. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह (Deadbody) शवविच्छेदनासाठी कळवा येथील रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी कल्याण तालुका ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कुणी केली आणि कोणत्या कारणासाठी केली याबाबत पोलीस तपास करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
फोन लागत नाही म्हणून नातेवाईकांनी जाऊन पाहिले असता घटना उघड
अनुबाई शेलार या टिटवाळ्यातील घोटसई गावातील रहिवासी असून त्या एकट्याच राहतात. त्यांच्या पतीचे निधन झाले असून दोन मुली विवाहित आहेत. उदरनिर्वाहासाठी अनुबाई कल्याण मुरबाड महामार्गावर असलेल्या गोवेली येथे वडापावची टपरी चालवत होत्या. सलग दोन दिवस त्या नातेवाईकांचे फोन उचलत नव्हत्या. यामुळे नातेवाईक त्यांना भेटायला त्यांच्या टपरीवर गेले. टपरीवर गेल्यानंतर तेथील दृश्य पाहून नातेवाईकांना धक्काच बसला. अनुबाईंचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. धारदार शस्त्राने गळा चिरुन तिची हत्या करण्यात आली होती. विशेष म्हणजे गोवेली पोलीस चौकीपासून 50/75 मीटर अंतरावरच ही हत्या झाली आहे. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. अज्ञात आरोपींना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. (An old woman was killed by slitting her throat due to unknown reasons in Titwala)