Anant Ambani and Radhika Merchant Wedding : अंबानींच्या लग्नात बॉम्ब?, त्या पोस्टने एकच खळबळ, पोलिसांची उडवली झोप
मुकेश व नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत आणि राधिका मर्चंट यांचं लग्न १२ जुलै रोजी झालं असलं तरी अद्याप या विवाह सोहळ्यातील अनेक कार्यक्रम सुरू आहेत. रविवारी अनंत व राधिकाचं रिसेप्शन पार पडलं. त्याला मंगल उत्सव असं नाव देण्यात आलं होतं. यावेळी विविध मान्यवर व्यक्ती तसेच सेलिब्रिटीही उपस्थित होते.
मुकेश व नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत आणि राधिका मर्चंट यांचं लग्न १२ जुलै रोजी झालं असलं तरी अद्याप या विवाह सोहळ्यातील अनेक कार्यक्रम सुरू आहेत. रविवारी अनंत व राधिकाचं रिसेप्शन पार पडलं. त्याला मंगल उत्सव असं नाव देण्यात आलं होतं. यावेळी विविध मान्यवर व्यक्ती तसेच सेलिब्रिटीही उपस्थित होते. मात्र त्याच दरम्यान असं काही घडलं की पोलिसांसह सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. X (पूर्वीच ट्विटर) या सोशल मिडिया नेटवर्किंग साईटवरील एका पोस्टमुळे सर्व यंत्रणाच कामाला लागली. ती पोस्ट होती अंबानींच्या लग्नामध्ये बॉम्ब असल्याची शक्यता वर्तवणारी. ट्विटरवर एका युजरने पोस्ट केली होती की अंबानीच्या लग्नसोहळ्यात उद्या बॉम्ब फुटणार. यामुळे पोलिस यंत्रणा सतर्क झाली आणि बंदोबस्त वाढवण्यात आला. दरम्यान अशी पोस्ट करणाऱ्या त्या युजरचा पोलीस शोध घेत आहेत.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या पोस्टबद्दल माहिती होती, पण ती बनावट पोस्ट होती. मात्र, त्यानंतरही पोलिसांनी कोणतीही रिस्क घेतली नाही आणि ते पूर्णपणे सतर्क होते. या धमकीच्या पार्श्वभूमीवर बांद्रा-कुर्ला काँप्लेक्स येथील विवाह स्थळाची सुरक्षा अतिरिक्त वाढवण्यात आली.
काय म्हटलं होतं धमकीत ?
मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये एका शानदार सोहळ्यात अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट शुक्रवारी विवाहबंधनात अडकले. यानंतर आशीर्वाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये प्रत्येक क्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थिती लावली. त्याचवेळी ट्विटरवीर @FFSFIR हँडल असलेल्या एका माजी युजरने एक पोस्ट केली. त्यामध्ये असे म्हटले होते की, माझ्या मनात असा विचार येतोय की अंबानींच्या लग्नात बॉम्बस्फोट झाला तर अर्धे जग उलटेल. याच पोस्टची दखल घेत पोलीस सतर्क झाले आणि कसून कामाला लागले. सुरक्षेतही वाढ करण्यात आली. मात्र याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अद्याप कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. मात्र 13 जुलैला हा मेसेज पोस्ट करणारी व्यक्ती आणि त्यामागचा हेतू शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
my mind is wondering shamelessly that half the world would go upside down tomorrow of a b0 m b went off at the ambani wedding
trillions of dollars in one pin code 🚀
— × (@ffsfir) July 13, 2024
ज्या खात्यावरून हे ट्विट करण्यात आले त्या युजरची माहिती गोळा करण्यात मुंबई पोलिसांची सायबर टीम सध्या व्यस्त आहे. यासंदर्भात X (ट्विटर) कडूनही तपशील मागवण्यात आला आहे. रविवारी सायंकाळपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नसला तरी, या युजरचा शोध घेण्यासाठी प्राथमिक तपास सुरू करण्यात आला आहे.
कडेकोट सुरक्षा तैनात
या लग्नासाठी केकोट सुरक्षा तैनात करण्यात आली होती. वैयक्तिक मोबाईलवर पाठवलेल्या क्यूआर कोडच्या आधारेच लग्नसमारंभात प्रवेश देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. अंबानी कुटुंबाच्या मालकीच्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये शुक्रवारी झालेल्या या लग्नाला अनेक सेलिब्रेटी, व्यावसायिक, क्रिकेटपटूंच्या हातावर प्रवेश करतानाच, कलर-कोडेड कागदी रिस्टबँड्स बांधलेले दिसले.तर दुस-या दिवशी मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसाठी ‘शुभ आशीर्वाद’ नावाचा आशीर्वाद सोहळा आयोजित करण्यात आला होता.
व्हीआयपींना कायद्यात सूट ?
दरम्यान या लग्नसोहळ्या दरम्यान दिसलेल्या एका गोष्टीवरून नवीनच चर्चा सुरू झाली आहे. अंबानीच्या लग्नसोहळ्यात वापरलेल्या गाडीच्या नंबरप्लेटवरील तीन शून्य मिसिंग होते. अनंत अंबानी यांच्या लग्नसोहळ्यासाठी व्हीआयपी गाड्यांचा ताफा होता, त्यामध्येच ही गाडी होती. या ताफ्यात असणाऱ्या रॉल्स रॉयस गाडीचा नंबर एम 01 ईपी 0001 असा असतानाही एम 01 ईपी 1. इतकाच उल्लेख नंबरप्लेटवर असल्याचं समोर आलं. त्यामुळे या प्रकारानंतर व्हीआयपी लोकांसाठी कायद्यात सूट आहे का असा सवाल विचारला जातोय.