मुख्याध्यापक दाम्पत्याकडून पोटच्या मुलींची डंबेल्सने हत्या, सूर्योदयाला लेकी पुन्हा जिवंत होण्याची ‘अंधश्रद्धा’

अंधश्रद्धेतून आई-वडिलांनी दोन तरुण मुलींचा जीव घेतल्याची घटना आंध्र प्रदेशात उघडकीस आली आहे. (Principal Couple kills daughters )

मुख्याध्यापक दाम्पत्याकडून पोटच्या मुलींची डंबेल्सने हत्या, सूर्योदयाला लेकी पुन्हा जिवंत होण्याची 'अंधश्रद्धा'
Follow us
| Updated on: Jan 25, 2021 | 3:00 PM

हैदराबाद : अंधश्रद्धेतून आई-वडिलांनी पोटच्या दोन मुलींची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोमवारी सतयुग सुरु होणार असल्यामुळे सूर्योदयाला दोन्ही लेकी पुन्हा जिवंत होतील, असा हैराण करणारा दावा या माता-पित्याने केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आंध्र प्रदेशातील आरोपी दाम्पत्य उच्चशिक्षित असून मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. (Andhra Pradesh Principal Couple kills two daughters out of superstitions)

मुख्याध्यापक दाम्पत्याकडून पोटच्या मुलींची हत्या

अंधश्रद्धेतून आई-वडिलांनी दोन तरुण मुलींचा जीव घेतल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यामधील मदनापल्ले गावात रविवारी रात्री हत्याकांड घडले. 27 वर्षीय अलेख्या आणि 22 वर्षीय साई दिव्या अशी मयत तरुणींची नावं आहेत. शिवालयम मंदिर रोड परिसरात नायडू कुटुंब राहत होतं. आरोपी आई पद्मजा आणि वडील पुरुषोत्तम हे दोघंही मुख्याध्यापक आहेत.

मयत मुलीही उच्चशिक्षित

मोठी मुलगी अलेख्याने भोपाळमधून मास्टर्स डिग्री मिळवली आहे. धाकटी कन्या साई दिव्या हिचं बीबीएपर्यंत शिक्षण झालं आहे. साई दिव्या मुंबईत एआर रहमान म्युझिक स्कूलची विद्यार्थिनी होती. लॉकडाऊनच्या काळात ती घरी परतली होती.

डोक्यात डंबेल्सनी प्रहार करुन हत्या

नायडू कुटुंब लॉकडाऊनच्या काळात विचित्र वागत होतं, अशी माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली. रविवारी रात्री घरातून आरडाओरड ऐकल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली होती. डोक्यात डंबेल्सनी प्रहार करुन निर्दयी मातापित्याने लेकींचा बळी घेतल्याचा आरोप आहे.

मृतदेह लाल रंगाच्या कापडाने झाकलेले

पोलिसांनी घरात शिरण्याचा प्रयत्न केला तेव्हा दाम्पत्याने त्यांची अडवणूक केली. मात्र पोलिसांनी घरात जाऊन पाहणी केली तेव्हा सगळेच अवाक झाले. एका मुलीचा मृतदेह पूजेच्या खोलीत होता, तर दुसरी मुलगी बेडरुममध्ये मृतावस्थेत आढळली. दोघींचे मृतदेह लाल रंगाच्या कापडाने झाकले होते. (Andhra Pradesh Principal Couple kills two daughters out of superstitions)

मुली सूर्योदयासोबत जिवंत होतील, पालकांची अंधश्रद्धा

आरोपी दाम्पत्याच्या चेहऱ्यावर गुन्ह्यानंतर अजिबात तणाव दिसत नव्हता. पोलिसांनी हत्येचं कारण विचारलं असता त्यांनी चक्रावणारा जबाब दिला. कलियुग समाप्त होत असून सोमवारपासून सतयुग सुरु होणार आहे. त्यामुळे दोन्ही मुली सूर्योदयासोबत जिवंत होतील, असा दावा त्यांनी केला. पोलिसांनी आरोपी पती-पत्नीला ताब्यात घेतलं आहे. दोघींचे मृतेदह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या :

सहा लाखांचे कबुतर विकत घ्या, मुलाचा मृत्यू टळेल, पुण्यातील कुटुंबाची अंधश्रद्धेतून लूट

हिंगोलीत लाखो रुपयांच्या मांडूळांची तस्करी करणारे दोघे जण अटकेत

धक्कादायक! भोंदूबाबाकडून एका कुटुंबातील 4 महिलांवर अत्याचार

(Andhra Pradesh Principal Couple kills two daughters out of superstitions)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.