Andra Pradesh : आंध्र प्रदेशमध्ये ट्रक लॉरीमध्ये भीषण अपघात, सहा जणांचा जागीच मृत्यू
गुर्जलाचे डीएसपी जयराम यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींना गंभीर दुखापत झाली आहे.
नवी दिल्ली – आंध्र प्रदेशमध्ये (Andra pradesh) भीषण रस्ता अपघात झाला आहे. राज्यातील पालनाडू (palnadu) जिल्ह्यात ट्रक आणि पार्क केलेल्या लॉरीमध्ये भीषण टक्कर झाली आहे. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून दहा जण जखमी झाले आहेत. जखमींना नरसरावपेठ येथील गुर्जला शासकीय रुग्णालयात (government hospital) दाखल करण्यात आले आहे. गुर्जलाचे डीएसपी जयराम यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींना गंभीर दुखापत झाली आहे.
Andhra Pradesh | Six persons were killed and ten others injured in a road accident between a truck and a parked lorry in Palnadu district. The injured were shifted to Gurzala Government Hospital in Narasaraopet: Jayram, DSP, Gurjala pic.twitter.com/0bkopBQMrx
हे सुद्धा वाचा— ANI (@ANI) May 30, 2022
गुर्जला पोलिस उपअधीक्षकांनी अपघाताची माहिती दिली
गुर्जलाचे पोलिस उपअधीक्षक (डीएसपी) जयराम यांनी सांगितले की, ट्रक श्रीशैलमहून येत होता. अपघाताच्या वेळी ट्रकमध्ये 39 प्रवासी होते. पालनाडू जिल्ह्यात हा भीषण अपघात झाल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. तर अन्य 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. जखमींना नरसरावपेठ येथील गुर्जला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
अनेकजण गंभीर जखमी
जखमी झालेल्यामध्ये अधिकजण गंभीर आहेत. त्यामुळे मृतांचा आकड़ा वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर घटनास्थळावरची सगळी माहिती पोलिसांनी घेतली आहे.
“आम्ही अपघाताचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
एका पोलीस अधिकाऱ्याने फोनवर सांगितले, “आम्ही अपघाताचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. काहींना गंभीर दुखापत झाली असून, त्यांना चांगल्या उपचारासाठी गुंटूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आणि सरकारने मृतांच्या नातेवाईकांना मदत आणि जखमींना चांगले उपचार मिळावेत अशी विनंती केली आहे. रात्रीच्यावेळेस असे अपघात होत असतात. अनेकदा चालकाला झोप लागल्याने असे अपघात झाले आहेत. पण रात्री झालेला अपघात अत्यंत भीषण होता.
त्यामुळे अवघ्या जिल्ह्यात अपघाताबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी घेण्यात आले आहेत. नातेवाईकांनी रूग्णालय परिसरात मोठी गर्दी केली आहे.