Dhule : तपकिर न दिल्यामुळे चिडलेल्या पतीचा पत्नीवर कुऱ्हाडीचा घाव, सासऱ्याची पोलिस ठाण्यात तक्रार

शिरपूर तालुक्यातील नटवाडे गावातील नवऱ्याने स्वतःच्या बायकोवर कुऱ्हाडीने घाव घालत पत्नीचा खून केल्याची घटना धुळे जिल्ह्यात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Dhule : तपकिर न दिल्यामुळे चिडलेल्या पतीचा पत्नीवर कुऱ्हाडीचा घाव, सासऱ्याची पोलिस ठाण्यात तक्रार
Dhule : तपकिर न दिल्यामुळे चिडलेल्या पतीचा पत्नीवर कुऱ्हाडीचा घाव, सासऱ्याची पोलिस ठाण्यात तक्रार Image Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Aug 19, 2022 | 3:32 PM

धुळे : धुळे (Dhule) जिल्ह्यात एक असा गुन्हा झाला आहे त्यामुळे खळबळ उडाली आहे. पतीने रागाच्या भरात पत्नीचा कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केली आहे. याबाबत एक कारण असं समजलं आहे. पतीने पत्नीकडे तपकीर मागितली होती. परंतु पत्नीने तपकीर देण्यास नकार दिला होता. त्यानंतर चिडलेल्या पतीने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड घातली. त्यामुळे पत्नीचा मृत्यू झाल्याची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाली आहे. पोलिसांनी (Police) आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. नटवाडे (Natwade) गावातील ही या महिन्यातील दुसरी घटना आहे.

नेमकं काय घडलं

शिरपूर तालुक्यातील नटवाडे गावातील नवऱ्याने स्वतःच्या बायकोवर कुऱ्हाडीने घाव घालत पत्नीचा खून केल्याची घटना धुळे जिल्ह्यात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या महिलेला शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरातील लोकांना उपजिल्हा रुग्णालयात आणल्याशिवाय मृमतदेह ताब्यात घेणार नसल्याची भुमिका मृत महिलेच्या माहेरच्या मंडळींनी घेतली आहे.नटवाडे येथे सहा महिन्यात खूनाची ही दुसरी घटना घडली आहे. तर धुळे जिल्ह्यात पंधरा दिवसात ही तिसरी घटना घडली आहे.

हे सुद्धा वाचा

सासऱ्याची पोलिसात तक्रार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत महिलेचा पती रामलाल हजाऱ्या पावरा वय 50 याने तपकिर मागितल्याने तपकीर दिली नसल्याच्या रागातून त्याने पत्नी गीताबाई पावरा हिच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची तक्रार मयत महिलेचे वडिल मुलसिंग आवा पावरा वय 60 रा परधानदेवी पोस्ट उमर्दा ता. शिरपुर पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे.

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.