गावात केलेल्या कामांची बिले काढण्यासाठी ग्रामसेवकाने मागितली लाच, अधिकाऱ्यांनी लावली फिल्डींग…
महाराष्ट्रात लाच घेताना अनेक अधिकाऱ्यांना आतापर्यंत रंगेहात पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. विशेष म्हणजे गावात केलेल्या कामांची बीलं काढण्यासाठी...
बुलढाणा : 35 हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Division) ग्रामसेवकास (GRAMSEVAK) रंगेहात पकडले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई झाल्यानंतर गावकऱ्यांनी गावात आनंद व्यक्त केला. गावात केलेल्या कामाची बिले काढण्यासाठी लाच मागितली होती, अशी माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. 35 हजार घेताना ग्रामसेवक अच्युतराव काकडेला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची कसून चौकशी करण्यात येणार आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पुढील कारवाई सुरु केली आहे. ज्यावेळी ग्रामसेवकाला (MAHARASHTRA NEWS IN MARATHI) ताब्यात घेतल्याची माहिती समजली, त्यावेळी गावकरी खूष झाले आहेत.
लाच लुचपत विभागाने रंगेहाथ पकडण्यात
बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा एका ग्रामसेवकास लाच घेताना लाच लुचपत विभागाने रंगेहाथ पकडण्यात आले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जयरामगड येथे केलेल्या कामाची बिले काढण्यासाठी ग्रामसेवक अच्युतराव काकडे यांनी बिलाचे कमिशन म्हणून 6 टक्केने 36 हजार कमिशन मागितले होते अशी माहिती समजली आहे.
बुलढाणा जिल्ह्यात एकच खळबळ माजली
पस्तीस हजार रुपयाची रोख स्वीकारताना काल रात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामसेवक अच्युतराव काकडे यांना रंगेहात पकडले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत भ्रष्टाचार होतं असल्याचे उजेडात आले आहे. या कारवाईनंतर बुलढाणा जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत अशा पद्धतीच्या अनेक कारवाया करण्यात आल्या आहेत. तरी अधिकारी लाज घेताना सापडत असल्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. ग्रामसेवकाला निलंबित करुन पुढील करवाई करण्यात येणार आहे. याच्या आगोदर सुध्दा असा काय प्रकार घडला आहे का ? याची सुध्दा चौकशी करण्यात येणार आहे.