मुंबईतील प्रसिद्ध मुच्छड पानवालावर छापा, छापेमारीत काय सापडले?
एएनसीने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ई-सिगारेट विक्रीचे चार गुन्हे नोंदवले गेले, ज्यामध्ये मुच्छड पानवालाचा मालक शिवकुमार तिवारीच्या अटकही झाली. खेतवाडी परिसरातील त्याच्या गोदामासह पान दुकानावर छापा टाकण्यात आला.
मुंबई : गिनिज बुकमध्ये नोंद असलेला मुंबईतील प्रसिद्ध मुच्छड पानवालाच्या मालकाला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. मुंबई क्राईम ब्रँचने मुच्छड पानावालाच्या खेतवाडीतील दुकानात छापेमारी केली. छापेमारी दरम्यान पोलिसांना त्याच्या गोदामाची मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गोदामातही छापा टाकला. या छापेमारीत 15 लाखाची ई-सिगारेट हस्तगत करण्यात आली आहे. मुच्छड पानावालाचा मालक शिवकुमार तिवारी याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. क्राईम ब्रँचने शाळा आणि महाविद्यालयांजवळ विकल्या जाणाऱ्या ड्रग्ज आणि ई-सिगारेटवर मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली आहे. गेल्या दोन आठवड्यात अंमली पदार्थ विरोधी सेल (ANC) आणि समाजसेवा शाखा (SSB)ने केलेल्या अनेक ऑपरेशन्समध्ये, हजारो ई-सिगारेट आणि कोट्यवधींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी 16 जणांना अटक केली आहे.
दुकान आणि गोदामावर छापा
एएनसीने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ई-सिगारेट विक्रीचे चार गुन्हे नोंदवले गेले, ज्यामध्ये मुच्छड पानवालाचा मालक शिवकुमार तिवारीच्या अटकही झाली. खेतवाडी परिसरातील त्याच्या गोदामासह पान दुकानावर छापा टाकण्यात आला.
या छाप्यात निकोटीन आणि तंबाखूची चव असलेल्या शेकडो ई-सिगारेट जप्त करण्यात आल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंध कायदा 2019 च्या कलम 7, 8, आणि 9 अंतर्गत जप्ती करण्यात आली असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे.
इतक्या मोठ्या प्रमाणात ई-सिगारेट कुठून आणल्या याचा तपास सुरू आहे. झडतीदरम्यान, एनसीने 1,36,500 रुपये किमतीचच्या ई-सिगारेट जप्त केल्या आहेत.
कोण आहे मुच्छड पानावाला?
मुच्छड पानवाला हे मुंबईतील प्रसिद्ध पान शॉप आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी, मुंबईतील अनेक प्रसिद्ध उद्योगपती आणि टेक टायकून येथे पान खाण्यासाठी येतात. हे दुकान मुंबईत 70 च्या दशकापासून सुरू आहे आणि आता त्याचे नाव खूप प्रसिद्ध आहे. त्यांची स्वतःची वेबसाइट देखील आहे. हे पान शॉप ऑनलाइन फूड ऑर्डरिंग पोर्टलवरही ऑर्डर घेते.