Ulhasnagar: तुम्ही खरेदी केलेली स्काय आणि प्यूमाची बॅग ओरिजनल आहे का ? पोलिसांच्या कारवाईनंतर प्रकरण उजेडात
उल्हासनगर परिसरात अनेक ठिकाणी बॅगा तयार करण्याचे कारखाने आहेत. पोलिसांना बनावट बॅग तयार करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार क्राईम बॅचच्या पोलिसांनी कॉपी राईट विभागाच्या मदतीने कारवाई केली.
कल्याण : उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) ब्रँडेड कंपन्यांची नक्कल करून बनावट बॅग (Duplicate bags) तयार करणाऱ्या कारखान्यांवर ठाणे गुन्हे शाखेने (thane crime batch) आणि कॉपीराईट विभागाने कारवाई केली. या कारवाईत स्कायबॅग आणि प्यूमा कंपनीची नक्कल करून तयार केलेल्या लाखो रुपयांच्या बॅग जप्त करण्यात आल्या. काल पोलिसांनी विविध ठिकाणी कारवाई केली. त्या कारवाईत अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे जप्त करण्यात आलेल्या बॅग हुबेहुब ओरिजनल बॅग सारख्या दिसत असल्याचं पोलिसांनी जाहीर केलं आहे. कालच्या कारवाईमुळे इतर कारखाने चालक चांगलेचं घाबरले असल्याची माहिती समजली आहे.
नेमकं काय झालं
उल्हासनगरच्या कॅम्प 3 मधील पवई चौक परिसरात बॅग तयार करण्याचे अनेक कारखाने आहेत. तिथं एम. कुमार, ए.के. बॅग यांच्यासह पाच ते सहा मोठ्या कारखान्यांवर कॉपीराईट विभाग आणि ठाणे गुन्हे शाखेने ठरवून धाडी टाकली. त्यावेळी स्कायबॅग, प्यूमा यांच्यासह अनेक नामांकित ब्रँड्सची नक्कल करून हुबेहूब बनावट बॅग तयार केल्या जात असल्याचं पोलिस आणि कॉपी राईट विभागाच्या लक्षात आलं.
त्यानंतर पोलिसांनी कारखान्यांवर कारवाई करत तब्बल साडेसात लाख रुपयांच्या बनावट बॅग जप्त केल्या. उल्हासनगर शहरात अनेक ठिकाणी अशा पद्धतीने बनावट बॅग तयार केल्या जात असून त्यामुळे या कारवाईनंतर बॅग कारखानदारांचे धाबे चांगलेच दणाणले असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शैलेश साळवी यांनी सांगितलं.
उल्हासनगर परिसरात अनेक ठिकाणी बॅगा तयार करण्याचे कारखाने आहेत. पोलिसांना बनावट बॅग तयार करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार क्राईम बॅचच्या पोलिसांनी कॉपी राईट विभागाच्या मदतीने कारवाई केली.