सचिन वाझेनंतर आता सुनील मानेचीही कार जप्त, बोरिवलीतून लाल गाडी NIA च्या ताब्यात

पोलीस निरीक्षक सुनील माने याचे जुने कार्यालय असलेल्या कांदिवली क्राईम ब्रांच युनिट 11 मध्येही एनआयएने छापे टाकले. (Sunil Mane Red Car NIA)

सचिन वाझेनंतर आता सुनील मानेचीही कार जप्त, बोरिवलीतून लाल गाडी NIA च्या ताब्यात
Follow us
| Updated on: Apr 26, 2021 | 10:19 AM

मुंबई : एनआयएच्या अटकेतील पोलीस निरीक्षक सुनील माने (Police Inspector Sunil Mane) याची कार जप्त करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने अंधेरी, कांदिवली आणि बोरिवली भागात छापेमारी करुन मानेची लाल रंगाची गाडी जप्त केली. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सुनील मानेला अटक करण्यात आली आहे. निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझेच्या कार जप्त होत असताना आता मानेचीही गाडी ताब्यात घेण्यात आली आहे. (Arrested Police Inspector Sunil Mane Red Car detained by NIA from Borivali)

पोलीस निरीक्षक सुनील माने याचे जुने कार्यालय असलेल्या कांदिवली क्राईम ब्रांच युनिट 11 मध्येही एनआयएने छापे टाकले. बोरिवलीतील साईनगर परिसरातून सुनील मानेची लाल रंगाची कार एनआयएने ताब्यात घेतली. दोन गाड्यांच्या नंबर प्लेट सारख्याच असल्याचे समोर आले आहे. सुनील माने हा मुंबईतील कांदिवली क्राईम ब्रांच युनिट 11 मध्ये पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होता. सध्या त्याची सशस्त्र पोलीस दलात बदली करण्यात आली आहे.

सुनील मानेचा हिरेन यांना फोन : NIA

मनसुख हिरेन यांना हत्येच्या दिवशी विनायक शिंदे नाही, तर सुनील माने यानेच फोन करुन बोलावलं होतं. सुनील माने मनसुख हिरेन यांच्या हत्येवेळी घटनास्थळी उपस्थित असल्याचंही एनआयएने कोर्टात सांगितलं.

दहशतवाद विरोधी पथकाच्या काळाचौकी युनिटमध्ये गेल्या महिन्यात सुनील मानेची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडे हस्तांतरित करण्यात आला होता. आता सुनील मानेला एनआयएने अटक केली आहे.

कांदिवली क्राईम ब्रांचमधून फोन

आपल्या पतीला कांदिवली क्राईम ब्रांचमधून फोन आला होता, आणि चौकशीसाठी बोलावलं होतं, असं मनसुख हिरेन यांचा मृतदेह मिळाल्यानंतर त्यांची पत्नी विमल हिरेन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण नेमकं काय?

मनसुख हिरेन यांची हत्या घडली त्या रात्री नेमकं काय घडलं, याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्या रात्री आरोपींनी हिरेन यांच्या नाकावर जबरदस्ती क्लोरोफॉर्म टाकलं. त्यामुळे हिरेन तात्काळ बेशुद्ध पडले. त्यानंतर आरोपींनी त्यांची हत्या केल्याचं सूत्रांनी सांगितलं. पोस्टमार्टमच्या रिपोर्टनुसार हत्येपूर्वी हिरेन यांच्या चेहऱ्यावर मार लागलेला होता. त्यांच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला मार लागलेला होता. मृत्यूपूर्वी हा मार लागलेला होता. तसेच त्यांच्या अंगावर काही ठिकाणी मार होता. विशेषत: डोक्यालाही मार लागलेला होता, असं सूत्रांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

विनायक शिंदे नाही, सुनिल मानेचा मनसुख हिरेन यांना हत्येच्या दिवशी फोन, NIA चा दावा

पोलीस निरीक्षक सुनील माने यांना अटक, मनसुख हिरेन हत्या प्रकरणी बेड्या

(Arrested Police Inspector Sunil Mane Red Car detained by NIA from Borivali)

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.