Pune Crime : नोकरी करीत नसल्याने वडील त्याला नेहमीच शिवीगाळ करायचे, एक दिवस त्याने थेट..
मुलगा नोकरी कामधंदा करीत नसल्याने वडीलांनी दारू पिऊन शिवीगाळ केली, मुलाने रागाच्या भरात असे काही केले की त्याला कायमचा पश्चाताप झाला..
मुंबई : वडील चपला शिवायचे काम करायचे आणि मुलगा हाताशी येऊनही काही कामधंदा न करता घरी बसून ऐतखाऊ बनला होता. यातून वडील नेहमी दारू पिऊन मूलाला नोकरी कामधंदा बघ असा सल्ला देत बसायचे आणि शिव्याही घालायचे. त्या दिवशीही वडील कामावरून आले आणि त्यांनी पुन्हा बडबड सुरू केली. त्यामुळे रागाच्या भरात मुलाचा पारा वाढल्याने त्याने वडीलांना काठीने मारले आणि नको ते घडले…
पुण्याच्या हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मांजरीतील घुले पाटील कॉलनीत राहणाऱ्या रवी ( वय 52 ) यांचा मुलगा ओंकार ( वय 27 ) काहीही कामधंदा न करता घरी बसून असायचा. त्याने काही तरी कामधंदा पाहावा यासाठी ते नेहमी त्याला बोलायचे. रवी हे चपला शिवायचे काम करायचे. ते नेहमी दारू पिऊन घरी यायचे आणि मुलाला नोकरी किंवा कामधंदा नसल्याने त्यांचे नेहमीच टोमणे ऐकायला लागायचे.
आणि वडील निपचित पडले
9 मे रोजी दुपारी रवी घरी आले आणि त्यांनी आपल्या मुलाला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. मुलगा ओंकार यामुळे चांगलाच संतापला आणि त्याने लागलीच वडीलांना काठीने मारहाण करायला सुरुवात केली. त्यात त्याने रागाच्या भरात काठीने त्यांचा गळा दाबल्याने ते निपचित पडले. त्यानंतर ओंकार रागाने घरातून निघून गेला. त्याची आई घरी आली तेव्हा निपचित पडलेल्या पतीला तिने दवाखान्यात नेले. तेथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषीत केले. शवविच्छेदनात त्यांचा गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे उघड झाले. आईने जेव्हा चौकशी केली तेव्हा मुलाने वडीलांचा गळा दाबल्याची कबूली दिली. ओंकारला पोलिसांनी अटक केली आहे.