Asaram Bapu : आसाराम बापू दहा वर्षांपासून जेलमध्ये, का मिळाला नाही अद्याप जामीन?

Rape Convict Asaram Bapu : उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात आतापर्यंत १५ वेळा जामीन अर्ज पाठवला. पण, अद्याप जामीन मिळाला नाही. आसाराम बापूने राम जेठमलानी, सुब्रमण्यम स्वामी आणि सलमान खुर्शीदसारखे प्रसिद्ध वकिलांची फौज उतरवली. पण, जोधपूर मध्यवर्ती जेलचा दरवाजा काही आसाराम बापूसाठी खुला झाला नाही.

Asaram Bapu : आसाराम बापू दहा वर्षांपासून जेलमध्ये, का मिळाला नाही अद्याप जामीन?
Follow us
| Updated on: Sep 02, 2023 | 11:05 PM

नवी दिल्ली, २ सप्टेंबर २०२३ : आसाराम बापू आता ८२ वर्षांचा झालाय. दहा वर्षांपूर्वी आसाराम बापूला अटक झाली. गेल्या दहा वर्षांपासून आसाराम बापू जेलमध्येच आहे. अजूनही सुटकेची कोणतीही संधी दिसत नाही. आसाराम बापूला जेलमध्ये १२० महिने म्हणजे दहा वर्षे पूर्ण झालीत. उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात आतापर्यंत १५ वेळा जामीन अर्ज पाठवला. पण, अद्याप जामीन मिळाला नाही. आसाराम बापूने राम जेठमलानी, सुब्रमण्यम स्वामी आणि सलमान खुर्शीदसारखे प्रसिद्ध वकिलांची फौज उतरवली. पण, जोधपूर मध्यवर्ती जेलचा दरवाजा काही आसाराम बापूसाठी खुला झाला नाही.

३१ ऑगस्ट २०१३

३१ ऑगस्ट २०१३ ला आसाराम बापूला अटक झाली. तेव्हापासून आसाराम बापूला खुली हवा मिळाली नाही. दरम्यान जोधपूर जेलमधून कितीतरी आरोपींना सुटका झाली. पण, आसाराम बापूसाठी जोधपूर जेल मुक्कामी ठरली. सलमान खान तीन दिवसांत जोधपूर जेलमधून बाहेर आला. पण, आसाराम बापू गेल्या दहा वर्षांपासून अद्याप जेलमध्येच आहे.

हे सुद्धा वाचा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या आरोपात आसाराम बापू जेलमध्ये आहे. १५ वेळा आसाराम बापूकडून जामिनासाठी अर्ज करण्यात आले. मात्र, अद्याप जामीन मिळाला नाही. आता शेवटची आशा गुजरात उच्च न्यायालयावर आहे. पण, यावर केव्हा निर्णय होणार, हे सांगणे कठीण आहे.

८२ वर्षांचा आसाराम बापू

आसाराम बापूचा जन्म १७ एप्रिल १९४१ ला झाला. वयाचा दाखला देऊन जामिनासाठी अर्ज केला. पण, न्यायालयाने आसाराम बापूवर दया दाखवली नाही. जन्मठेपेची शिक्षा झालेले अमरमणी त्रिपाठी, आनंद मोहनसह इतर आरोपी जेलबाहेर आले. मात्र, आसाराम बापूला अद्याप जामीन मिळाला नाही. आसाराम बापू ६४ वर्षांचा असताना २१ वर्षीय मुलीवर त्याने अत्याचार केला होता. एक नव्हे तर दोन बलात्काराच्या प्रकरणात आसाराम बापू सापडला आहे.

१०१२ पानांचे आरोपपत्र

आसाराम बापूविरोधात १४ गुन्ह्यांतर्गत आरोप सुरू आहेत. १ हजार १२ पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले. १४० जणांची साक्ष झाली. जोधपूर पोलिसांनी आसाराम बापूला पूर्णवेळ जेलमध्ये ठेवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले आहेत.

Non Stop LIVE Update
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.