अज्ञात व्यक्तीला ‘लिफ्ट’ देताय, मग जरा जपून अन्यथा तुमच्यावरही येऊ शकते ‘ही’ वेळ
लुटारूने तो जखमी असल्याचा दिखावा केला त्याने पायाला पट्टी बांधली होती. आतमध्ये खूप मोठी जखम झाली असून मला चालता येत नाही, मला पुढे नेऊन सोडा अशी विनवणी त्या लुटारुने दुचाकीस्वराला केली होती.
नवी दिल्ली : रस्त्यात कुणीतरी हात दाखवतोय आणि लिफ्ट मागतोय तर त्या व्यक्तीला मदत (Help) करताना थोडा विचार करा. आपण संकटात असल्याचा आव आणणारे अज्ञात लोक काही वेळेला तुम्हाला संकटात टाकू शकतील. अशाच एका घटनेत एका व्यक्तीने पायावर पट्टी बांधून दुचाकीस्वाराकडे लिफ्ट (Ask the biker for a lift) मागितली. त्या दुचाकीस्वाराने त्याला गाडीवर बसवले. मात्र काही अंतर गेल्यानंतर पीडित व्यक्तीने आपले खरे रूप दाखवले आणि लिफ्ट देणाऱ्याला लुटून (A biker was robbed) पसार झाला.
आरोपीने स्वतःजवळ लपवून ठेवलेला चाकू बाहेर काढत दुचाकीस्वाराच्या गळ्यावर टेकवला आणि त्याला लुटले. हा धक्कादायक प्रकार उघडकीस येतात परिसरात एकच खळबळ उडाली आहे. देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीतील रोहिणी परिसरात ही खळबळजनक घटना घडली आहे.
मोबाईल बरोबरच दुचाकीही पळवून नेली
चोरट्याचा प्रताप ऐकून पोलिसांसह परिसरातील नागरिक ही चक्रावून गेले आहेत. त्या लुटारूने दुचाकीस्वाराच्या खिशातील पैसे आणि मोबाईल चोरला. त्याचबरोबर दुचाकीस्वराला दूर ढकलून देत त्याची दुचाकीही पळून नेली.
या घटनेप्रकरणी बेगमपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार असून घटनास्थळाच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेज तपासून त्याचा शोध घेतला जात आहे.
पायाला जखम झालेय थोडे पुढे नेऊन सोडा म्हणाला अन्…
लुटारूने तो जखमी असल्याचा दिखावा केला त्याने पायाला पट्टी बांधली होती. आतमध्ये खूप मोठी जखम झाली असून मला चालता येत नाही, मला पुढे नेऊन सोडा अशी विनवणी त्या लुटारुने दुचाकीस्वराला केली होती. त्याची दया आल्यामुळे दुचाकीस्वाराने त्याला पुढे नेण्यास तयारी दाखवली.
मात्र काही अंतरावरच त्याला त्याची माणुसकी दाखवणे महागात पडले. मोकम सिंह असे तक्रारदार दुचाकीस्वाराचे नाव असून तो पेशाने मेकॅनिक आहे. व्यायाम करण्यासाठी दुचाकीवरून चालला होता, त्याच दरम्यान हा लुटीचा प्रकार घडला.
जीवे मारण्याची दिली धमकी
लुटारूने जीवे मारण्याची धमकी दिली, गळ्यावर चाकू टेकवत तुला आत्ताच खाल्लास करेन असे धमकावले. त्यानंतर हात वर करायला लावले त्यावेळी दुचाकीस्वाराच्या खिशातील पैसे आणि मोबाईल लंपास केला.
यानंतर दुचाकीस्वाराला दूर ढकलून देत त्याची दुचाकीही पळवून नेली. लुटारूने मुख्य रस्त्याच्या दिशेने धूम ठोकली. त्यामुळे त्याला पकडणे पोलिसांपुढे एक मोठे आव्हान बनले आहे.