नवरदेवाला धीर नव्हता, भरमंडपात त्याने हे काय केलं?, नवरीने थेट पोलीस स्टेशन गाठलं

नवरदेवाने किस केल्यानंतर नवरीने स्टेजवरुन खाली येत थेट पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर पोलिसांना सर्व घटनाक्रम सांगून नवरदेवावर कारवाई करण्याची मागणी केली.

नवरदेवाला धीर नव्हता, भरमंडपात त्याने हे काय केलं?, नवरीने थेट पोलीस स्टेशन गाठलं
अमानुष छळ करणाऱ्या पती आणि सासरच्यांविरोधात महिलेची पोलीस ठाण्यात धावImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Nov 30, 2022 | 8:46 PM

संभल : उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात एक अनोखे प्रकरण उघडकीस आले आहे. विवाह म्हटलं की थट्टा, मस्करी, रुसणं, चिडवणं या सर्व गोष्टी घडतात. काहीतरी छोट्यामोठ्या कुरबुरी होऊन वाद, भांडण झाल्याचे आणि पोलिसात तक्रार गेल्याचे आपण नेहमी ऐकतो. मात्र संभल जिल्ह्यात वेगळेच प्रकरण पोलीस ठाण्यात गेले आहे. एका विवाह सोहळ्यात नवरदेवाने सर्वांसमोर नवरीला किस केले म्हणून चिडलेल्या नवरीने थेट पोलीस ठाणे गाठले.

नवरदेवाने किस केल्यानंतर नवरीने स्टेजवरुन खाली येत थेट पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर पोलिसांना सर्व घटनाक्रम सांगून नवरदेवावर कारवाई करण्याची मागणी केली.

काय आहे प्रकरण?

बदायू जिल्ह्यातील बिल्सी गावात 26 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री सामूहिक विवाहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बिल्सी गावातील तरुणाचा पवासा गावातील तरुणीसोबत विवाह झाला. त्यानंतर 28 नोव्हेंबर रोजी पवासा गावात रितीरिवाजानुसार विवाहाचे आयोजन करण्यात आले होते.

हे सुद्धा वाचा

विवाह समारंभावेळी वरमाळा घातल्यानंतर नवरदेवाने सर्वांसमोर नवरीला किस केले. यामुळे नवरी भडकली आणि रुममध्ये निघून गेली. घरच्यांनी नवरीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने स्टेजवर येण्यास नकार दिला.

यानंतर ती नातेवाईकांसह थेट बहजोई पोलीस ठाण्यात पोहचली. नवरदेवाकडचे लोकही पोलीस ठाण्यात पोहचले. मात्र नवरीने नवऱ्यासोबत नांदण्यास नकार दिला. तसेच नवरदेवावर कारवाई करण्याचीही मागणी केली.

नवरीनेच नवऱ्याला दिले होते चॅलेंज

वरपक्षानेही यावेळी आपली बाजू मांडली आहे. नवरीनेच नवऱ्याला चॅलेंज दिले होते. त्याने सर्वांसमोर तिला किस केले तर ती त्याला 1500 हजार रुपये देईल. जर तो असे करु शकला नाही तर त्याला नवरीला 3000 रुपये द्यावे लागतील, असे वरपक्षाने म्हटले आहे. मात्र नवरीने ही बाब नाकारली आहे.

यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने दोघांमध्ये समझोता करण्यात आला. त्यानुसार पती-पत्नी दोघेही वेगळे राहतील. दोघांना घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.