डॉक्टरांनी चक्क हातावार लिहून दिले प्रिस्क्रिप्शन, मेयो रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

नागपूरच्या मेयो रुग्णालयात मोठ्या प्रमाणात औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे रुग्णांना ओषधासाठी बाहेरुन मेडिकलमधून औषध आणावी लागत आहेत.

डॉक्टरांनी चक्क हातावार लिहून दिले प्रिस्क्रिप्शन, मेयो रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 28, 2023 | 12:12 PM

नागपूर / गजानन उमाटे : नागपूरच्या मेयो शासकीय रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. डॉक्टरांनी चक्क हातावर प्रिस्क्रिप्शन लिहून दिल्याचा प्रकार घडला आहे. मेयो रुग्णालयात औषधांचा तुटवडा असल्याने बाहेरून औषध घेण्यासाठी डॉक्टर हा पर्याय निवडतात. नियमानुसार प्रिस्क्रीपशनवर डॉक्टरांच्या सही आणि शिक्का आवश्यक असताना नियमांचं सर्रास उल्लंघन करत हातावर प्रिस्क्रिप्शन लिहून दिलं जातंय आणि बाहेरुन औषध आणायला सांगितलं जातंय.

मेयो रुग्णालयात औषधांचा तुटवडा

एक नाही तर अनेक रुग्णांचे नातेवाईक अशाप्रकार हातावर प्रिस्क्रिप्शन घेऊन येतात, असं मेयो रुग्णालयाबाहेरील औषधविक्रेत्यांनी सांगितलं. नागपूरच्या शासकीय मेयो रुग्णालयात औषधांचा तुटवडा असल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. सरकारने स्थानिक पातळीवर औषधी खरेदीची मर्यादा 10 टक्क्यांवरुन 30 टक्क्यांवर नेली आहे. तरीही रुग्णांच्या नातेवाईकांना औषधासाठी बाहेर जावं लागतंय.

पालघरमध्येही आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार उघड

पालघर आरोग्य विभागाचा रुग्णांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ पुन्हा एकदा उघड झाला आहे. तलासरी तालुक्यातील उधवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एका मद्यपी आरोग्य सेवकाकडून एका चिमुकल्या मुलीवर उपचार करण्याचा प्रयत्न केला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा मद्यपी शिपाई चक्क डॉक्टरचा सल्ला न घेताच या चिमुकलीला इंजेक्शन देण्याचा प्रयत्न करत होता. मात्र रुग्णाच्या सोबत असलेल्या कुटुंबीयांनी त्याला रोखून धारेवर धरलं.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड.
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल.
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?.
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?.