Atiq Ahmed : अठरा वर्षांनी तिचा शाप अखेर खरा ठरला, कोण आहे ही महिला, जिच्या शापाने माफीया अतिक अहमदचे अख्खे कुटुंबच संपले
प्रयागराज (अलाहाबाद ) दक्षिण-पूर्व उत्तर प्रदेशातील गंगा आणि जमूना संगमाचे हे शहर सध्या 40 वर्षांच्या अतिक अहमद याच्या गुंडगिरीतून मुक्त झाल्याचे म्हटले जात आहे. परंतू एका महिलेचा शाप त्यास कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे.
प्रयागराज : प्रयागराजमध्ये शनिवारी मेडीकलसाठी नेत असताना गॅंगस्टर टर्न पॉलिटीशीयन अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांचा पोलीसांच्या देखत गुंडांनीच खात्मा केला. मात्र या घटनेला 18 वर्षांपूर्वी घटलेल्या एका घटनेचा संदर्भ दिला जात आहे. हाताची मेंदीही न सुखलेल्या नव्या नवरीने हा शाप दिला. माझ्या पतीला जसे मारले गेले तसे एक दिवशी अतिकच्या पापाचा घडा भरेल असा शाप लग्नाच्या नवव्या दिवशी कुंकू पुसले गेलेल्या महिलेने दिला होता. कोण आहे ही महिला..जिच्या शापाने अख्ख्या कुटुंबाची वाताहत झाली…
तीन दिवसात अतिकच्या परीवारातील तीन जणांना माती दिली गेली. प्रथम अतिकच्या मुलाला पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये यमसदनी धाडले. त्यानंतर दोनच दिवसात अतिक आणि त्याच्या भावाला पोलिसाच्या समक्ष गोळ्या घालून ठार करण्यात आले. शनिवारी रात्री उशीरा घडलेल्या हत्याकांडाचा संदर्भ 18 वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनाक्रमाशी लावला जात आहे. अतिक आणि त्याच्या हस्तकांचा असाच शेवट घडायला एका महिलेचा शाप कारणीभूत ठरला आहे.
अतिक कुटुंबाला पराभवाचा फटका आणि बदला
माजी आमदार राजू पाल यांची पत्नी पूजा पाल असे या महिलेचे नाव आहे. ही घटना साल 2004 मधली आहे. प्रयागराजमधून अतिक अहमद याने लोकसभा निवडणूक जिंकली होती. याच दरम्यान प्रयागराज पश्चिम विधानसभेची पोट निवडणूक लागली. 2005 मध्ये या रिकाम्या झालेल्या जागेसाठीच्या पोट निवडणूकीत अतिकने त्याचा भाऊ अश्रफ याला मैदानात उतरवले. त्याच्या विरोधात बसपाच्या तिकीटावर राजू पाल उभे राहीले होते. तेव्हा पहिल्यांदा अतिक कुटुंबाला पराभवाचा फटका बसला. आमदार म्हणून विजयी होताच राजू पाल यांचा विवाह पूजा बरोबर झाला. एकतर आमदार झाला त्यात लग्नपण ठरल्याचा राजू यांचा दुहेरी आनंद अतिक कुटुंबिय पचवू शकले नाहीत. अतिकने भाऊ अश्रफवर राजू पाल यांच्या हत्येची कामगिरी सोपविली.
गोळ्यांच्या वर्षावाने हत्या
25 जानेवारी 2005 रोजी धुमनगंज येथे चारीबाजूंनी घेरून आमदार राजू पाल यांची गोळ्यांच्या वर्षावाने हत्या झाली होती. राजू पाल यांना पळवून मारण्यात आल्याने प्रयागराज हादरले. लग्नाच्या नवव्या दिवशी पतीची हत्या झाल्याने पूजा यांनी शाप दिला. माझ्या पतीला जसे मारले तसा एक दिवस तूही मारशील असा तो शाप होता. हा शाप अखेर अशा प्रकारे आपले संपूर्ण कुटुंबच उध्वस्त करेल असे अतिकला स्वप्नातही वाटले नसेल. अठरा वर्षांनंतर आज तीन दिवसात अतिकच्या कुटुंबियाचे नोमोनिशान मिटले आहे. दोन अल्पवयीन मुले जेलमध्ये आहेत. पत्नी शाहीस्ता फरार आहे. दोन दिवसांपूर्वी मुलाचा एन्काऊंटर झाला तर त्याच्या दोन दिवसात पती अतिक आणि दीरा गोळ्या घातल्या गेल्या.