पुन्हा ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश; ‘या’ बंदरातून जप्त केले तब्बल 200 कोटींचे हेरॉईन

कोलकातामध्ये केलेल्या कारवाईदरम्यान 36 गिअर बॉक्समध्ये लपवून कंटेनरमध्ये सुमारे 40 किलो हेरॉईन आणले गेल्याचे आढळले.

पुन्हा ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश; 'या' बंदरातून जप्त केले तब्बल 200 कोटींचे हेरॉईन
मुंबई आणि गुजरातमध्ये एनसीबीची मोठी कारवाईImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 10, 2022 | 12:27 AM

नवी दिल्ली : देशभरात ड्रग्ज तस्करीचा गोरखधंदा सुसाट सुरु असल्याचे नव्या कारवाईतून उघड झाले आहे. गुजरात पाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्ये ड्रग्ज तस्करी (Drug Smuggling)चा पर्दाफाश झाला आहे. कोलकाता बंदराजवळ तब्बल 200 कोटी रुपयांचे हेरॉईन (Heroin) जप्त करण्यात आले आहे. गुजरातचे दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पथक या दोन यंत्रणांनी संयुक्त कारवाई करीत हे ड्रग्ज जप्त (Drug Seized) केले आहे.

36 गिअर बॉक्समध्ये लपवून आणले होते ड्रग्ज

ड्रग्ज माफिया नवनव्या क्लुप्त्या लढवून तस्करीचा गोरखधंदा करीत आहेत. कोलकातामध्ये केलेल्या कारवाईदरम्यान 36 गिअर बॉक्समध्ये लपवून कंटेनरमध्ये सुमारे 40 किलो हेरॉईन आणले गेल्याचे आढळले.

गुजरातचे पोलिस महासंचालक आशिष भाटिया यांनी या कारवाईची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, 36 गिअर बॉक्सपैकी 12 बॉक्समध्ये पांढऱ्या शाईच्या खुणा सापडल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

हे दुबईतील जेबेल अली बंदरातून एका शिपिंग कंटेनरमध्ये पाठवण्यात आले होते. यावर्षी फेब्रुवारीमध्ये ते कोलकाता बंदरात पोहोचले. हे हेरॉईन कोलकाता येथून दुसऱ्या देशात निर्यात करण्यात येणार होते.

72 पाकिटांमध्ये सापडले 40 किलो हेरॉईन

गुप्त माहिती मिळाल्यानंतर गुजरात एटीएसने छापेमारी केली. यादरम्यान एटीएस आणि डीआरआयच्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने कोलकाता बंदराजवळून सुमारे 40 किलो हेरॉईन जप्त केले.

36 गिअर बॉक्समध्ये हेरॉईनची 72 पाकिटे सापडली. हे गिअर बॉक्स उघडले असता त्यामध्ये पांढऱ्या रंगाची पावडर आढळून आली. या प्रकरणी अजूनही तपास सुरू आहे. उर्वरित गिअर बॉक्स उघडण्याचे कामही सुरू आहे.

ड्रग्ज जप्तीच्या लागोपाठोपाठ कारवाया

यापूर्वी 18 ऑगस्ट रोजीही गुजरात एटीएसने अंमली पदार्थांची मोठी खेप जप्त केली होती. जुलैमध्ये 376.5 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले होते.

गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील मुंद्रा बंदराजवळ कापडाच्या रोलमध्ये लपवून ठेवलेले 376 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले होते. ते यूएईमधून पंजाबला पाठवण्यात आले होते.

तसेच मे महिन्यातही एटीएसने मुंद्रा बंदराजवळ एका कंटेनरमधून 500 कोटी रुपयांचे 56 किलो कोकेन जप्त केले होते. त्याचबरोबर एप्रिलमध्ये डीआरआयने कच्छमधील कांडला बंदराजवळ एका कंटेनरमधून 1,439 कोटी रुपयांचे 205.6 किलो हेरॉईन जप्त केले होते.

लागोपाठच्या कारवायांनी ड्रग्ज माफियांच्या कारनाम्यांची पोलखोल केली आहे. मात्र धडक कारवाया करूनही ड्रग्ज माफियांना जरब बसला नसल्यामुळे तपास यंत्रणांनी चिंता व्यक्त केली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.