हिरेन मनसुख मृत्यूप्रकरणाच्या तपासाला वेग, एटीएस पथकांचे शोधसत्र, मनसुख कुटुंबीयांची चौकशी
हिरेन मनसुख मृत्यूप्रकरणाच्या तपासासाठी एटीएस अधिकाऱ्यांची विविध पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांवर वेगवेगळी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. | ATS hiren mansukh death case
ठाणे: विधिमंडळाच्या अधिवेशनात विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केल्यानंतर आता हिरेन मनसुख मृत्यूप्रकरणाच्या (Hiren Mansukh death case) तपासाला वेग आला आहे. आज सकाळीच डीसीपी राजकुमार शिंदे हे ठाणे येथील एटीएसच्या कार्यालयात दाखल झाले होते. तेव्हापासून ठाण्यातील एटीएस कार्यालायतून वेगाने सूत्रे हलायला लागली आहेत. (ATS team search in Thane regarding hiren mansukh death case)
हिरेन मनसुख मृत्यूप्रकरणाच्या तपासासाठी एटीएस अधिकाऱ्यांची विविध पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांवर वेगवेगळी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काहीवेळापूर्वीच यापैकी एक पथक ठाण्यातील TJSB आणि ICICI या बँकांमध्ये जाऊन आल्याचे समजते. या पथकाने हिरेन मनसुख याच्या बँक खात्यातील व्यवहारांचा तपशील घेतला असून ते पुन्हा एटीएसच्या कार्यालयात परतले.
‘हिरेन मनसुखच्या कुटुंबीयांची चौकशी’
काहीवेळापूर्वीच हिरेन मनसुख यांची पत्नी आणि मुलाला चौकशीसाठी एटीएसच्या कार्यालयात आणण्यात आले होते. बराच वेळ उलटल्यानंतरही अजूनही या दोघांची चौकशी सुरु असल्याचे समजते. हिरेन मनसुख यांची पत्नी विमला मनसुख यांनी थेट सचिन वाझे यांच्यावर आपल्या पतीची हत्या केल्याचा आरोप केला आहे.
मुंबई आणि ठाण्यात एटीएसच्या पथकांचा तपास
एटीएसकडून मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणाच्या तपासासाठी ठाण्यात पथके तैनात करण्यात आली आहेत. मुंबई एटीएसच्या जवळपास तीन ते चार टीम ठाण्यात तपास करत आहेत. यापैकी पहिले पथक एटीएस कार्यालयात आहे. तर आणखी एका पथकाने हिरेन मनसुखच्या दुकानाची रेकी केली. तिसरे पथक मुंब्रा पोलीस ठाण्यात तपासासाठी गेले होते. याशिवाय, एटीएसच्या पथकांकडून अन्य भागांचीही रेकी सुरु असल्याचे समजते.
एटीएसची टीम मुंब्र्यात, हिरेन मृत्यू प्रकरणाचे नाट्य रुपांतर करणार
मनसुख हिरेन हत्या प्रकरणात तपास करणारी मुंबई एटीएसची टीम आज मुंब्रा रेतीबंदर (ATS Team Will Recreate The Scene) परिसरात येऊन सीन रिक्रिएट करणार असल्याची माहिती आहे. मनसुख हिरेन यांची हत्या नेमकी कशी झाली, कुठे झाली आणि हत्या करुन त्यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर परिसरात आणून टाकला का?, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं यातून शोधण्याचा एटीएसचा प्रयत्न असणार आहे मनसुख हिरेन यांचा मृतदेह 5 मार्च रोजी मुंब्रा रेतीबंदर परिसरात आढळला होता. हा मृतदेह किनाऱ्यापासून तब्बल 80 फूट आतमध्ये आढळला होता. मात्र, एखाद्याची हत्या करुन मृतदेह इतक्या आतमध्ये फेकणं शक्य नसल्याचं मत मृतदेह बाहेर काढणाऱ्या क्रेनच्या चालकाने व्यक्त केलं. त्यामुळे मनसुख हिरेन यांची हत्या रेतीबंदर परिसरात झाली? की हत्या करून त्यांना खाडीत फेकण्यात आलं? असे प्रश्न उपस्थित झाले होते.
संबंधित बातम्या :
VIDEO: देवेंद्र फडणवीस यांचं सर्वात मोठं विधान; पत्नीच्या संशयानुसार मनसुख हिरेन यांची सचिन वाझेंकडून हत्या
मोहन डेलकर यांच्या आत्महत्येची चौकशी एसआयटीद्वारे करणार, गृहमंत्र्यांची घोषणा
Mansukh Hiren Death Case | एटीएस मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा हत्येच्या अँगलनं तपास करणार
(ATS team search in Thane regarding hiren mansukh death case)