शेतजमिनीचा वाद टोकाला गेला, मग शेतकऱ्यासोबत जे घडलं ते भयानक

दोन शेतकऱ्यांमध्ये जमिनीचा वाद होता. हा वाद न्यायालयातही गेला होता. न्यायालाने यावर तोडगा काढत पीडिताच्या बाजूने निर्णय सुनावला होता. मात्र आरोपीला तो मान्य नव्हता.

शेतजमिनीचा वाद टोकाला गेला, मग शेतकऱ्यासोबत जे घडलं ते भयानक
शेतजमिनीच्या वादातून शेतकऱ्यावर हल्लाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 12, 2023 | 3:39 PM

गोंदिया : शेतजमिनीच्या वादातून शेतकऱ्याची पावड्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना गोंदियात घडली आहे. जिल्ह्यातील गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या दांडेगाव गावात ही घटना घडली. खेमलाल महारू पटले असे पीडित 56 वर्षीय शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी गंगाझरी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी मयताच्या कुटुंबीयांनी केली आहे. आरोपींनी शेतातून जात असताना पटले यांच्या डोक्यात लोखंडी पावड्याने वार करून जखमी केले.

न्यायालयाच्या आदेशानंतरही आरोपीकडून हल्ला

शेतकऱ्याने गावातील एका व्यक्तीकडून अर्धा एकर जमीन विकत घेतली होती. त्यात स्पष्ट लिहिले होते की, शेतकऱ्याला येण्याजाण्यासाठी आरोपींच्या जमिनीतून 10 फुटांचा रस्ता देण्यात आला होता. मात्र आरोपींना न्यायालाचा आदेश मान्य नव्हता. त्यामुळे त्यांच्यात नेहमीच मतभेद होते. याच कारणातून शेतकरी आणि आरोपी यांच्यात भांडण व्हायचे. त्यामुळे शेतकऱ्याने न्यायालयात याबाबत तक्रार केली होती. त्यावर न्यायालयाने शेतकऱ्याला शेतातून ये-जा करण्यासाठी रस्ता द्या, असे आदेश दिले होते.

मात्र न्यायालयाच्या आदेशाची अवमानना करत आरोपींनी शेतकऱ्यावर हल्ला करून जखमी केले. शेतकऱ्यावर उपचारा सुरु आहेत. न्यायालयाचा आदेश न झुगारणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कुटुंबीय आणि नागरिकांकडून होत आहे. याप्रकरणी गंगाझरी पोलीस पुढील तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.