अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या वनकर्मचाऱ्यांवर हल्ला; पेट्रोलने वाहन पेटविण्याचा प्रयत्न

वन विभागाच्या हद्दीत स्थानिक आदिवासींनी अतिक्रमण केले होते. वारंवार सुचना देऊनही अतिक्रमण काढाला तयार नसल्याने वन विभाग कारवाई करण्यास गेले.

अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या वनकर्मचाऱ्यांवर हल्ला; पेट्रोलने वाहन पेटविण्याचा प्रयत्न
अतिक्रमण हटवण्यास गेलेल्या पथकावर हल्लाImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 25, 2023 | 2:39 PM

भंडारा / तेजस मोहतुरे : शासकीय वन जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याकरीता गेलेल्या वनकर्मचाऱ्यांच्या पथकावर 20 ते 25 अतिक्रमण धारकांनी हल्ला केल्याची घटना भंडाऱ्यात घडली. लाठीकाठी आणि कुऱ्हाडीने हल्ला करत तुमसर वनपरिक्षेत्राधिकारी यांच्या वाहनावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्नही केला. तसेच अश्लिल शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना भंडारा जिल्हाच्या तुमसर तालुक्यातील गोंडीटोला येथे घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सिहोरा पोलीस ठाण्यात 10 ते 15 व्यक्तींविरोधात गुन्हे नोंद करण्यात आले आहे.

सुचना देऊनही अतिक्रमण हटवत नव्हते

तुमसर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या बपेरा सहवनक्षेत्रातील मौजा गोंडिटोला (सुकळी) येथील गट क्रमांक 23 आणि 36/2 मध्ये 25 ते 20 आदिवासी लोकांनी शासकिय जागेवर काही दिवसापूर्वी अतिक्रण केले होते. त्यांना वारंवार तोंडी आणि लेखी सुचना देऊनही त्यांनी अतिक्रमण सोडले नाही. उलट ॲट्रॉसिटी कायदाचा धाक दाखवून दहशत वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी आतापर्यंत 4 वनगुन्हे दाखल केले आहेत.

घटनेच्या दिवशी सोड्या येथील बिटरक्षक डी. ए. कहुळकर, क्षेत्र सहाय्यक यु. के. ढोके, बिट रक्षक ए. जे. वासनिक, डी. जे. उईके, वनरक्षक ए. डी. ठवकर आणि वन मजूर इमारचंद शिवणे गस्तीवर असताना त्यांना मौजा गोंडीटोला (सुकळी) गट क्रमांक 23 आणि 36/2 मध्ये 20 ते 25 व्यक्ती दिसून आले. हे सर्वजण ट्रॅक्टरच्या सहाय्याने नागरटी आणि धुरे बनविताना दिसून आले.

हे सुद्धा वाचा

अतिक्रमण हटवण्यास गेलेल्या कर्मचाऱ्यांर हल्ला

बिटरक्षक कहुळकर यांनी अतिक्रमणधारकांना ट्रॅक्टर बाहेर काढण्यास सांगितले. यावेळी जमावाने त्यांना अश्लिल शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. वनपरिक्षेत्राधिकारी छगन राहांगडाले शासकीय वाहनाने कर्मचाऱ्यांसह अतिक्रमणस्थळी दाखल झाले आणि अतिक्रमण करण्यापासून जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला.

यानंतर जमावाने लाठ्या-काठ्या, पेट्रोलची बॉटल आणि कुऱ्हाडीने वनकर्मचाऱ्यांवर हल्ला के. वनपरिक्षेत्राधिकारी छगन रहांगडाले आणि बिटरक्षक कहुळकर यांचे कॉलर पकडून धक्काबुक्की केली. इतर कर्मचाऱ्यांना तात्काळ निघून जा, अन्यथा तुम्हाला कुऱ्हाडीने कापून टाकू आणि पेट्रोल टाकून पेटवू, अशी धमकी दिली. शासकीय वाहनाचे नुकसान केले.

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुपलं, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुपलं, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....