नवरदेवाला हळद लागताना घरात तिघांवर हल्ला, कल्याणमध्ये थरार, महिलेचा मृत्यू

एका हळदीच्या कार्यक्रमात घरातील तिघांवर अज्ञातांकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले होते.

नवरदेवाला हळद लागताना घरात तिघांवर हल्ला, कल्याणमध्ये थरार, महिलेचा मृत्यू
Crime
Follow us
| Updated on: Feb 22, 2021 | 9:17 AM

कल्याण : कल्याणमधील सापर्डे गावात एक धक्कादायक प्रकार घडला (Attack On Three By Unknown In Halad Program). येथील एका हळदीच्या कार्यक्रमात घरातील तिघांवर अज्ञातांकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर दोघांवर उपचार सुरु आहेत (Attack On Three By Unknown In Halad Program).

नेमकं काय घडलं?

हळद कार्यक्रम सुरु असताना घरात असलेल्या तीन जणांवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना कल्याणमधील सापर्डे गावात घडली आहे. या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे, तर दोन जणांवर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. लूटच्या उद्देशाने हा प्रकार घडला आहे, की यामागे दुसरं काही कारण आहे, याचा तपास खडकपाडा पोलीस करीत आहेत.

रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास कल्याण पश्चिमेतील सापर्डे गावात एका तरुणाचा हलदी कार्यक्रम सुरु होता. गावातील लोक या कार्यक्रमात व्यस्त होते. याच दरम्यान ज्या तरुणाचा हळदी कार्यक्रम सुरु होता त्याच्या जवळच राहणाऱ्या नातेवाईकच्या घरी अज्ञातांकडून तीन जणांवर प्राणघातक हल्ला झाला.

यात सुवर्णा गोडे या महिलेचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. तर भारती म्हात्रे आणि पवन म्हात्रे हे दोघे गंभीर जखमी झाले. स्थानिक नगरसेवक जयवंत भोईर यांचा म्हणणे आहे की लुटीच्या उद्देशाने ही घटना घडली आहे. कारण मृत महिलेचे सर्व दागिने गायब आहेत. ही घटना दुर्दैवी आहे. 12 तासात पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला पाहिजे. नाहीतर शिवसेना आंदोलन करणार, असा इशाराही त्यांनी दिला (Attack On Three By Unknown In Halad Program).

याबाबत खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक पवार यांचे म्हणणे आहे की, या घटनेत एकाचा मृत्यू तर दोन जण जखमी आहेत. मात्र, ही घटना नक्की लुटीच्या उद्देशाने झाली आहे की नाही, याचा तपास सुरु आहे. यामागे दुसरं काही कारण आहे का, या दृष्टिकोनातून सुद्धा तपास सुरु आहे. मात्र, या घटनेमुळे कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Attack On Three By Unknown In Halad Program

संबंधित बातम्या :

व्हिडीओ गेम खेळताना मैत्री, नंतर प्रेम; अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला पोलिसांच्या बेड्या

Video : उकळत्या तेलात हात घालून महिलेच्या चारित्र्यसंपन्नतेची परीक्षा! हा कसला न्यायनिवाडा?

CCTV Video: पुण्याच्या एटीएममध्ये ‘मुळशी पॅटर्नचा’ थरार, तलवारी, कोयत्याचा हल्ला सीसीटीव्हीत कैद

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.