Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dombivali Crime : उसने घेतलेले पैसे परत केले नाही, संतापलेल्या कर्जदाराचा महिलेवर जीवघेणा हल्ला

उसने पैसे मागायला आलेल्या कर्जदाराला पती आल्यावर पैसे देईल असे महिलेने सांगितले. मात्र कर्जदाराचा संताप अनावर झाला आणि महिलेसोबत जे घडलं ते भयंकर.

Dombivali Crime : उसने घेतलेले पैसे परत केले नाही, संतापलेल्या कर्जदाराचा महिलेवर जीवघेणा हल्ला
उसने पैसे दिले नाही म्हणून महिलेला मारहाण
Follow us
| Updated on: Aug 10, 2023 | 2:54 PM

डोंबिवली / 10 ऑगस्ट 2023 : उसने दिलेले पैसे परत केले नाही म्हणून कर्जदाराने महिलेला जीवघेणी मारहाण केल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. या मारहाणीत महिला गंभीर जखमी झाले आहेत. जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ममताराणी असे पीडित महिलेचे नाव आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. राजीव भुयान असे आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कल्याण-डोंबिवलीत गुन्हेगारी सत्र थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. दररोज या ना त्या कारणातून हल्ल्यासारख्या घटना घडत आहेत. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पैसे न मिळाल्याने संतापला आणि महिलेवर हल्ला केला

डोंबिवली पूर्वेतील गोग्रासवाडी परिसरात ममताराणी ही महिला आपल्या कुटुंबासह राहते. महिलेच्या पतीने आरोपी राजीव भुयान याच्याकडून उसने पैसे घेतले होते. हे पैसे मागण्यासाठी राजीव मंगळवारी दुपारी महिलेच्या घरी गेला. मात्र महिलेने पती घरी नाहीत, ते आले की पैसे देऊ असे सांगितले. महिलेच्या बोलण्याचा राग आल्याने आरोपीने महिलेला आधी हाताने मारहाण करण्यास सुरवात केली. यानंतर पिशवीतून हातोडा काढला आणि महिलेच्या डोक्यात घातला. तो एवढ्यावरच थांबला नाही. मग त्याने इंजेक्शनसारखी टोकदार वस्तू महिलेच्या मानेला टोचली. यानंतर आरोपीने तेथून पळ काढला.

पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु

या घटनेत महिला गंभीर जखमी झाली. कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. महिलेच्या फिर्यादीवरुन टिळकनगर पोलिसांनी राजीव विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला नसल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.

हे सुद्धा वाचा

जय पवार यांचा साखरपुडा, शरद पवार हजेरी लावणार? बघा VIP मध्ये कोण-कोण?
जय पवार यांचा साखरपुडा, शरद पवार हजेरी लावणार? बघा VIP मध्ये कोण-कोण?.
सप्तश्रृंगी गडावर भविकांची अलोट गर्दी, एकमेकांना ढकलाढकली; घडलं काय?
सप्तश्रृंगी गडावर भविकांची अलोट गर्दी, एकमेकांना ढकलाढकली; घडलं काय?.
सोलापुरात संतापजनक प्रकार, बाळाला नुकताच जन्म अन् टाके असतानाही...
सोलापुरात संतापजनक प्रकार, बाळाला नुकताच जन्म अन् टाके असतानाही....
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मी शिकलो - छगन भुजबळ
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मी शिकलो - छगन भुजबळ.
'बैलजोडी जप्त करू..', धमकी देऊन गरीब शेतकऱ्याकडून केली वसूली
'बैलजोडी जप्त करू..', धमकी देऊन गरीब शेतकऱ्याकडून केली वसूली.
'वतन के, धर्म के गद्दार..', मानखुर्दमध्ये राऊतांच्या विरोधातले बॅनर
'वतन के, धर्म के गद्दार..', मानखुर्दमध्ये राऊतांच्या विरोधातले बॅनर.
'मुंडे खोटारडा माणूस, दर दिवशी नवीन बायका..' करूणा शर्मांचा गौप्यस्फोट
'मुंडे खोटारडा माणूस, दर दिवशी नवीन बायका..' करूणा शर्मांचा गौप्यस्फोट.
मोस्ट वॉन्टेड तहव्वूर राणाला अखेर भारतात आणलं
मोस्ट वॉन्टेड तहव्वूर राणाला अखेर भारतात आणलं.
ही सवय खूप घाण, औरंगजेबासोबत मुंडेंची तुलना? करूणा शर्मांचा गंभीर आरोप
ही सवय खूप घाण, औरंगजेबासोबत मुंडेंची तुलना? करूणा शर्मांचा गंभीर आरोप.
एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित पगार कधी? गुणरत्न सदावर्तेंची मोठी माहिती
एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित पगार कधी? गुणरत्न सदावर्तेंची मोठी माहिती.