आधी कारवर दगडफेक, मग तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला, कारण काय?

| Updated on: Jun 07, 2023 | 12:07 PM

दोघे मित्र कारमध्ये बसले होते. अचानक त्यांच्या कारवर दगडफेक सुरु झाली. यानंतर तरुणांसोबत जे घडले ते भयंकर होते.

आधी कारवर दगडफेक, मग तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला, कारण काय?
मीरारोडमध्ये असे काय घडले?
Image Credit source: socialmedia
Follow us on

जळगाव : शहरात खोटे नगर परिसरामध्ये एका तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार करून त्याला गंभीर जखमी करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. मंगळवार रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही हल्ल्याची घटना घडली आहे. हल्ल्यात जखमी तरुणाला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला. तरुणाच्या नातेवाईक आणि मित्रपरिवाराने रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती. हा हल्ला कुणी आणि का केला याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही. पोलिसांपुढे हल्लेखोरांना पकडण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. पोलीस याप्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

मित्रासोबत कारमध्ये बसला असताना हल्ला

अविनाश निंबा अहिरे असे हल्ल्यात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. अविनाश अहिरे हा मित्र राम सुभाष कुकडे याच्यासोबत खोटेनगरजवळ कार उभी करून त्यामध्ये बसला होता. अचानक तीन ते चार तरूण त्याठिकाणी आले. त्यांनी काहीतरी क्षुल्लक कारणावरून अहिरे आणि कुकडे यांना मारहाण करून त्यांच्या कारच्या काचेवर दगडफेक केली. यामध्ये कारची पुढील काच फुटली. नंतर एकाने अहिरे याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये अहिरे हा गंभीर जखमी झाला.

कुकडे याने लागलीच अहिरे याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात आणले. मात्र रात्री उपचारादरम्यान अहिरेचा मृत्यू झाला. मात्र हल्ला कोणत्या कारणातून झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. हल्ल्यानंतर हल्लेखोर पसार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान घटना तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असून, पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

हे सुद्धा वाचा