Vasai Crime : मुसळधार पावसाचा फायदा घेत एटीएम लुटायला गेले, पण पोलिसांच्या जाळ्यात अडकले !

मुसळधार पावसाचा फायदा घेत चोरटे एटीएममध्ये घुसले. पण एक तासाहून अधिक वेळ प्रयत्न करुनही प्रयत्न फसला आणि पोलिसांनी मुसक्या आवळल्या.

Vasai Crime : मुसळधार पावसाचा फायदा घेत एटीएम लुटायला गेले, पण पोलिसांच्या जाळ्यात अडकले !
हुंड्यासाठी गर्भवती विवाहितेला जिवंत जाळले
Follow us
| Updated on: Jul 25, 2023 | 3:27 PM

मुंबई / 25 जुलै 2023 : मुसळधार पावसाचा फायदा घेत एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला आणि पाच जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. वसई पश्चिमेतील बाभोळा नाक्याजवळील एटीएम शुक्रवारी पहाटे 3 वाजता फोडण्याचा प्रयत्न झाला. ही संपूर्ण घटना एटीएम किऑस्कमध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही संपूर्ण घटना कैद झाली आहे. मुख्य आरोपी डिसोझा हा महिनाभरापूर्वीच तुरुंगातून सुटला होता. त्याच्यावर घरफोडीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यानंतर त्याने टोळके जमवून पुन्हा चोरीचा प्रयत्न केला. पाचही जणांना अटक करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी माणिकपूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

एटीएममधील अलार्म वाजल्याने चोरटे पळाले

घटनेच्या दिवशी मुसळधार पाऊस असल्याने चोरट्यांना वाटले आपला मनसुबा सहज यशस्वी होईल. टोळक्याने एक तासाहून अधिक काळ एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र एटीएममधील सिक्युरिटी अलार्म वाजला आणि पकडले जाऊ नये म्हणून चोरट्यांनी पलायन केले. मात्र अलार्म वाजल्यानंतर पोलीस सतर्क झाले.

सापळा रचून आरोपींना अटक

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चोरट्यांचा कारनामा उघड झाला. पोलिसांनी अज्ञातांविरोधात दरोड्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एफआयआर दाखल केला. यानंतर आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. एटीएम सेंटरकडे जाणाऱ्या रस्त्यांचे सीसीटीव्ही स्कॅन करत गाडीचे लोकेशन तपासले. यानंतर सापळा रचून पोलिसांनी आरोपींची कार अडवून त्यांना अटक केली.

हे सुद्धा वाचा

मुख्य आरोपी डिसूझावर अनेक घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्यात वापरलेली कार डिसोझा याच्या मालकीची आहे. डिसोझाने परिसरातील चार लोकांना एकत्र केले आणि त्यांना घरे फोडण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी एटीएम केंद्रांवर नेले. सुरक्षा व्यवस्था नसलेले एटीएम त्याने निवडले. एटीएम मशीन फोडण्यात अयशस्वी झाल्यानंतर ते घरफोडी करण्याच्या विचारात होते, असे पोलिसांनी सांगितले.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.