शिकण्याच्या वयात त्याला भरपूर पैसे कमवून श्रीमंत व्हायचे होते, मग त्याने जे केले ते पाहून पोलीसही चक्रावून गेले !

त्याला भरपूर पैसे कमवून श्रीमंत व्हायचे होते. त्याला शेअर मार्केटचेही चांगले ज्ञान होते. पण शिकण्याच्या वयात त्याने जे केले त्याने पोलीसही हैराण झाले.

शिकण्याच्या वयात त्याला भरपूर पैसे कमवून श्रीमंत व्हायचे होते, मग त्याने जे केले ते पाहून पोलीसही चक्रावून गेले !
भाईंदरमध्ये पिस्तुलचा धाक दाखवत ज्वेलर्सला लुटण्याचा प्रयत्नImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 06, 2023 | 11:26 PM

रमेश शर्मा, TV9 मराठी, भाईंदर : बंदुकीचा धाक दाखवून ज्वेलर्स मालकाला लुटण्याचा प्रयत्न केल्याची घटना भाईंदरमध्ये घडली. भाईंदर पश्चिम येथील 60 फिट रोडवर शक्ती ज्वेलर्समध्ये ही घटना घडली. सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आरोपी 16 वर्षाचा असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पण दुकानमालकानेही हिंमत करुन आरोपीशी दोन हात करत त्याला पकडून भाईंदर पोलिसांच्या ताब्यात दिले. भाईंदर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन घटनेचा पुढील तपास करत आहे. आरोपीकडे प्लॅस्टिकचा बंदूक असल्याची प्राथमिक माहिती मिळते.

सोन्याची बिस्किटे गहाण ठेवण्याचा बहाणा केला

अशोक जैन यांचे मुंबईजवळील भाईंदर पश्चिम येथील 60 फूट रोडवरील इंदिरा कॉम्प्लेक्समध्ये शक्ती ज्वेलर्स नावाचे सोन्याचे दागिने दुकान आहे. शनिवारी सायंकाळी 4.45 च्या सुमारास एक मुलगा शाळेची बॅग घेऊन दुकानात आला आणि त्याने सोन्याची बिस्किटे गहाण ठेवण्याची ऑफर दिली. बिल नसल्याने जैन यांनी ते गहाण ठेवण्यास नकार दिला. तो मुलगा काही वेळ दुकानात उभा राहिला. त्यावर दुकान मालकाने त्याला शिवीगाळ करून पळवून लावले.

काही वेळाने आला आणि दुकानदारावल पिस्तुल रोखली

यावेळी अशोक जैन यांच्याशिवाय त्यांचा लहान भाऊ जिगरही दुकानात उपस्थित होता. जिगर पाणी आणण्यासाठी गेला होता. दरम्यान, काही वेळाने मुलगा परत आला आणि यावेळी त्याने पिस्तूल काढून थेट अशोक जैन यांच्यावर रोखली. मात्र 15 वर्षाच्या मुलाने गुन्हा करण्यासाठी जे धाडस दाखवले तेच धाडस दुकानमालकानेही दाखवले. दुकान मालकाने अडीच फूट उंचीच्या काउंटरवरून उडी मारून बंदूक हिसकावली. दुकानमालकाने आरडाओरडा करताच मुलगा पळून जाऊ लागला. पण तेथून जाणाऱ्या एका स्कूटीस्वाराने धावत जाऊन त्याला पकडले. मुलाकडून लायटर पिस्तूल, पेपर कटर मास्क जप्त करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

मुलगा खूप हुशार असून, त्याला देशाच्या आणि जगाच्या शेअर मार्केटची चांगली माहिती आहे. शेअर मार्केटमध्ये दहा लाख रुपये गुंतवून त्याला लवकर श्रीमंत व्हायचे होते. त्यामुळे त्याने हा गुन्हा केला आहे. मुलाच्या वडिलांचे डिमॅट खाते आहे, जे मुलगाच हँडल करतो. ज्वेलर्स मालकाकडे रोख रक्कम आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी त्याने सोन्याची बिस्किटे गहाण ठेवण्याचा बहाणा केला होता.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.