बंदुकीचा धाक दाखवून सोन्याचं दुकान लुटण्याचा प्रयत्न, पण मालकाच्या प्रसंगावधानाने दरोडेखोरांची ‘रनिंग स्पर्धा’
साताऱ्यातल्या खटावमधून थरारक घटना समोर येतीय. दरोडेखोरांनी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास सोन्याचं दुकान लुटण्याचा प्रयत्न केला परंतु ज्वेलर्स मालकाच्या प्रसंगावधानाने दरोडेखोरांनी तिथून पलायन केलं.दुकान मालकाने दरोडेखोराच्या हातात बंदूक असूनही जोरदार पलटवार केला.
सातारा : साताऱ्यातल्या खटावमधून थरारक घटना समोर येतीय. दरोडेखोरांनी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास सोन्याचं दुकान लुटण्याचा प्रयत्न केला परंतु ज्वेलर्स मालकाच्या प्रसंगावधानाने दरोडेखोरांनी तिथून पलायन केलं.दुकान मालकाने दरोडेखोराच्या हातात बंदूक असूनही जोरदार पलटवार केला.
नेमकं काय घडलं?
खटाव तालुक्यातील मायणी येथे मुख्य बाजारपेठेतील अमित माने यांच्या मालकीचे बालाजी ज्वेलर्स या दुकानावर रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास चार सशस्त्र दरोडेखोरांनी दुकानात प्रवेश करत दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. बंदूक दाखवत त्यांनी दहशत निर्माण केली. मात्र दुकान मालकाने प्रसंगावधान दाखवल्याने दरोडेखोरांना पलायन करावे लागले.
खटाव तालुक्यातील मायणी या ठिकाणच्या मुख्य बाजारपेठेत बालाजी ज्वेलर्स या दुकानावर चार सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र दुकान मालकाने प्रसंगावधान दाखवल्याने दरोडेखोर चोरी न करताच पसार झाले. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मायणी येथील बालाजी ज्वेलर्सचे मालक अमित माने हे आपल्या सराव दुकानात गुरुवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास हिशोबाचे काम करत होते. या दरम्यानच अज्ञात चार व्यक्ती बालाजी ज्वेलर्स यांच्या दुकानांमध्ये आले. यावेळी त्यांनी मालक कुठे आहे, म्हणत मालकाची कॉलर पकडून बंदूक दाखवून धमकावण्याचा प्रयत्न केला.
या दरम्यान त्यांच्यामध्ये झटापट झाली. परंतु दुकान मालकाने दरोडेखोराच्या हातात बंदूक असूनही जोरदार पलटवार केला. त्यांच्या जोरदार प्रतिकाराने आलेल्या दरोडेखोरांना तिथून पळ काढावा लागला. यानंतर स्थानिक नागरिकांनी दरोडेखोरांचा पाठलाग केला मात्र तिथून ते पळून जाण्यात यशस्वी झाले. नागरिकांनी गाड्यांवरुन दरोडेखोरांचा पाठलाग केला, पण काही वेळातच दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले. या घटनेची फिर्याद अमित माने यांनी मायनी पोलीस दूर क्षेत्रामध्ये केली आहे.
(Attempt to robbery a gold shop Maharashtra Satara Mayani)
हे ही वाचा :
इगतपुरी-कसारा स्थानकांदरम्यान पुष्पक एक्स्प्रेसवर दरोडा, तरुणीचा विनयभंग, दोघांना अटक