सततचे टोमणे, हातवारे, इशारे, छेडछाडीला कंटाळली, बीडमध्ये नववीत शिकणाऱ्या मुलीचा विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न
शाळेतून घरी परतत असताना नववीत शिकणाऱ्या मुलीची एका तरुणाने छेड काढली. अपमान सहन न झाल्याने मुलीने घरी येऊन विषारी औषध प्राशन केल्याची धक्कादायक घटना बीड तालुक्यातील गुंदा वडगाव या गावात घडलीय. पीडित मुलीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर बीडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बीड : शाळेतून घरी परतत असताना नववीत शिकणाऱ्या मुलीची एका तरुणाने छेड काढली. अपमान सहन न झाल्याने मुलीने घरी येऊन विषारी औषध प्राशन केल्याची धक्कादायक घटना बीड तालुक्यातील गुंदा वडगाव या गावात घडलीय. पीडित मुलीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर बीडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बाळू खंदारे असं आरोपीचे नाव आहे. घटनेनंतर पिंपळनेर पोलिस घटनास्थळी धाव घेतली मात्र पीडित मुलगी अद्याप शुद्धीवर आली नसल्याने पोलिसांना तिचा जवाब घेता आला नाही. या घटनेमुळे बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे.
छेडछाडीला कंटाळून मुलीने विष घेतलं
15 वर्षीय मुलीची गावातीलच एक अल्पवयीन मुलगा छेड काढत होता. तिला पाहून इशारे करणे, कमेंट करणे अशा पद्धतीने तो त्रास देत होता. 21 ऑक्टोबर रोजी सकाळी हाच प्रकार घडला. सततच्या छेडछाडीला कंटाळून मुलीने तिच्या घरी विषारी द्रव प्राशन केले. ही बाब आईच्या निदर्शनास आली, त्यानंतर तिला तातडीने बीडमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या पीडितेवर उपचार सुरु आहेत.
घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक बाळासाहेब आघाव यांनी रुग्णालयात धाव घेतली. दरम्यान मुलगी जवाब देण्याच्या परिस्थितीत नसल्याने पोलिसांनी कुटुंबियांना धीर देत जवाब नोंदवून घेऊ असा विश्वास दिला आहे.
बीड जिल्ह्यात अत्याचार वाढले…
गत दोन वर्षांपासून बीड जिल्ह्यात महिला अत्याचारावरील घटनेत मोठी वाढ झाली आहे. महिलांवरील अत्याचाराचे सर्वात जास्त गुन्हे केज तालुक्यात दाखल झाले आहेत. पोलिसांचा गुन्हेगारावरील वचक कमी झाल्याने जिल्ह्यात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. त्यामुळे महिला वर्गात सध्या दहशतीचे वातावरण आहे.
(Attempted suicide by poisoning a girl in Maharashtra Beed Crime)
हे ही वाचा :
अमरावतीत आर्थित विवंचनेतून शेतकऱ्याच्या मुलीची आत्महत्या, मन सुन्न करणारी सुसाईड नोट समोर