अफेअर्स की नॉनव्हेज? अतुल आणि निकितामध्ये पहिलं भांडण कशावरून झालं?
अतुल सुभाष याने जीवन संपवल्यानंतर निकिता आणि अतुल यांच्या नातेसंबंधातील अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. मांसाहार, पैशाचा वाद आणि अफेयर्समुळे त्यांच्यात वाद निर्माण झाले होते. अतुलने मृत्यूपूर्वी न्यायालयात निकिताच्या छळाची कहाणी सांगितली होती, तर निकितानेही अतुलवर गंभीर आरोप केले आहेत.
AI इंजीनिअर अतुल सुभाषने जीवन संपवल्यापासून निकिता आणि अतुल यांच्या संबंधातील अनेक धक्कादायक खुलासे बाहेर येत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, निकिता आणि अतुल यांच्यात पहिलं भांडण नॉनव्हेजवरून झालं होतं. खुद्द अतुलनेच ही माहिती दिली आहे. अतुलने मृत्यूपूर्वी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. हे खुलासे वाचल्यावर अनेकांना धक्का बसला आहे. एक महिला आपल्या नवऱ्याचा किती छळ करू शकते याचा अंदाज यातून येतो.
अतुलने जुलै 2024मध्ये कौटुंबिक न्यायालयात साक्ष देताना निकिताच्या छळाची कहाणी सांगितली होती. आमच्या घरात सर्वच शाकाहारी होते. निकिता मांसाहारी होती. निकिता घरात मांसाहार करायची. तसेच मांसाहार केल्यानंतर चिकन आणि मटणाची हाड घरातच टाकून द्यायची. अतुलला ते सहन होत नव्हतं. त्यामुळे निकिता आणि त्याचं वाजायचं. साफसफाई होत नसल्याने तो चिडायचा. पहिलं भांडण त्यांचं नॉनव्हेजवरूनच झालं. माझं जेव्हा नॉनव्हेजवरून निकिताशी पहिलं भांडण झालं तेव्हा माझ्या आईने परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न केला होता. पण निकिताने तिला धक्का दिला आणि मारहाण सुरू केली होती, असं अतुलने म्हटलं होतं.
अतुलचे अनेक अफेयर्स
निकितानेही अतुलवर उलटे आरोप लावले होते. अतुलचे अनेक अफेयर्स होते. ऑफिसच्या एका महिलेसोबत त्याचे अफेयर्स होते. त्याने बंगळुरूत इतर मुलींशीही संबंध ठेवले होते. जेव्हा मी याचा विरोध केला तेव्हा अतुलने त्याच्या आईच्या समोरच मला लाथा बुक्क्यांनी मारायला सुरुवात केली, असा आरोप निकिताने केला होता.
निकिताचेही अफेयर्स
अतुलनेही निकितावर गंभीर आरोप केले होते. निकिताचं एका तरुणासोबत अफेयर्स होतं. निकिताचं वागणं संदिग्ध होतं. त्यामुळेच आमच्यात वाद होत होते, असं अतुलने कोर्टाला सांगितलं होतं. लग्नापूर्वी निकिता दिल्लीत काम करायची. लग्नानंतर तिने बदली करून घेतली आणि बंगळुरूत यायचं ठरवलं. सुरुवातीच्या काळात सर्व काही व्यवस्थित होतं. पण नंतर नॉनव्हेज आणि पैशावरून भांडणं सुरू झाली, असं त्याने म्हटलंय. तसेच निकिता आणि तिच्या कुटुंबीयांनी आपल्याला हुंडा मागितल्याचा दावाही त्याने केला आहे.
तिघे पळाले
अतुलने जीवन संपवल्यानंतर निकिताची आई निशा सिंघानिया आणि भाऊ अनुराग गायब आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. ढालनगर टोला येथील त्यांच्या घराला पोलिसांनी नोटीस लावली आहे. तीन दिवसाच्या आत हजर व्हा, असे आदेश या नोटिशीत देण्यात आले आहेत.
फाईल्स चेकिंग सुरू
कर्नाटक पोलीस जौनपूर पोहोचली आहे. त्यांनी निकिता आणि तिच्या नातेवाईकांच्या घराला नोटिस लावली आहे. पोलीस या प्रकरणाशी संबंधित सर्व फाईल्स चेक करत आहे.