कौटुंबिक वाद टोकाला गेला, पुतण्याने जे केले त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!

घरचे सर्वजण रात्री जेवण करुन झोपले. पहाट होताच जे घडले ते भयंकर होतं. घटना उघड होताच गावात खळबळ उडाली. सर्व प्रकरणाचा तपास सुरु आहे.

कौटुंबिक वाद टोकाला गेला, पुतण्याने जे केले त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
कौटुंबिक वादातून पुतण्याने चौघांना संपवलेImage Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: May 13, 2023 | 3:56 PM

गंगोलीहाट : कौटुंबिक वादातून माथेफिरु तरुणाने पत्नीसह चौघांची हत्या केल्याची घटना उत्तराखंडमधील गंगोलीहाट येथे घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. संतोष राम असे अटक आरोपीचे नाव आहे. आरोपी छलिया नृत्यक आहे. मृतांमध्ये आरोपीच्या पत्नी, वहिनी, बहिण आणि काकीचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तीन मृतदेह ताब्यात घेतले. तर चौथा मृतदेह 16 तासानंतर घटनास्थळाहून 100 किमी दूर एका बंद घरात सापडला. घरगुती वादातून हे हत्याकांड घडल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. पोलीस याबाबत सखोल तपास करत आहेत.

पहाटे घरात घुसून तिघींना संपवले

छलिया नृत्य पेशाशी संबंधित शेर राम आणि मोहन राम एकमेकांच्या शेजारी राहतात. शुक्रवारी पहाटे 5 वाजण्याच्या दरम्यान शेर रामची पहिली पत्नी हेमंती देवी, सून रमा देवी, विवाहित मुलगी माया एका खोलीत झोपल्या होत्या. तर शेर रामची दुसरी मूक-बधिर पत्नी बसंती देवी गोशाळेत गेली होती. यादरम्यान मोहन रामचा मुलगा संतोष राम शेर रामच्या घरात घुसला. यानंतर त्याने रुममध्ये झोपलेल्या आपली काकी, वहिनी आणि चुलत बहिण यांची हत्या केली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. पोलिसांच्या सर्च ऑपरेशनमध्ये घटनास्थळापासून 100 किमी दूर असलेल्या एका बंद घरात आरोपीच्या पत्नीचा मृतदेह आढळला. आरोपी आपल्या काकाच्या कुटुंबीयांशी दररोज काही ना काही कारणातून भांडण करायचा. तसेच त्याने जीवे मारण्याची धमकीही दिली होती. आरोपी मानसिक रुग्ण असल्याची माहिती मिळते.

हे सुद्धा वाचा

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.