तो खरंच बॉम्ब निघाला !! औरंगाबादच्या कन्नड शहरात खळबळ, पोलीसही चक्रावले!

मागच्या आठवड्यात औरंगाबादमधील सरस्वती भुवन परिसरातही बॉम्ब आढळल्याची बातमी पसरली होती. पोलिसांनी तपास केला असता तो बॉम्ब नसून पॉवर बँक होती, असे निष्पन्न झाले. त्यामुळे कन्नड शहरात सापडलेली वस्तूही बॉम्बच आहे का, याविषयी शंका होती. आता तपासयंत्रणांनी तो बॉम्बच असल्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं पोलिसांसमोर आता नवं आव्हान उभं राहिलं आहे. 

तो खरंच बॉम्ब निघाला !! औरंगाबादच्या कन्नड शहरात खळबळ, पोलीसही चक्रावले!
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 2:51 PM

औरंगाबादः औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड शहरात (Kannad Bomb) ज्या वस्तूनं पोलिसांपासून सामान्यांपर्यंत घबराहट निर्माण केली होती, ती अखेर बॉम्बच असल्याचं निष्पन्न झालं आहे. आज सकाळपासूनच कन्नड शहरात मोठी खळबळ माजली आहे. शहरातील एका फर्निचर दुकानात (Furniture shop) बॉम्ब सदृश वस्तू आढळल्याने गोंधळ उडाला. फर्निचर दुकानदाराने दुकान उघडलं तेव्हा त्याला एक मोबाइलचा बॉक्स दिसला. हा अनोळखी बॉक्स दिसल्यानं त्यांनी तो उघडून पाहिला असता त्यात बॉम्बसारखी वस्तू आढळली. ते पाहून दुकानदाराची गाळण उडाली. त्यांनी तत्काळ यासंबंधीची माहिती पोलिसांना दिली. कन्नड पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी हा संपूर्ण परिसर निर्मनुष्य केला. बॉम्बशोधक पथकाला (Bomb Squad) पाचारण केलं. या पथकाचं काम पूर्ण होईपर्यंत शहरातील नागरिक आणि पोलिसांनी अक्षरशः श्वास रोखून धरला होता.

बॉम्बनाशक पथकाची यशस्वी कामगिरी

कन्नड शहरात आढळलेली ही वस्तू नेमकी काय आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी बॉम्ब शोधक आणि बॉम्ब नाशक पथकाला पाचारण केलं होतं. निरीक्षण केले असता तो बॉम्बच असल्याचे दिसून आले. पथकातील कर्मचाऱ्यांनी तत्काळ तो निकामी केली. बॉम्बचा स्फोट घडवून आणला. पोलिसांनी सदर परिसर आधीच निर्मनुष्य केल्यामुळे कुणालाही इजा झाली नाही. त्यामुळे उपस्थितांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

बॉम्ब आला कुठून?

आजच्या घटनेतील हा बॉम्ब लक्षात आला आणि त्यामुळे काहीही दुर्दैवी घटना घडली नाही, यामुळे सुरक्षा यंत्रणेला दिलासा मिळाला आहे. मात्र कन्नडमध्ये हा बॉम्ब आला कुठून, या प्रश्नाने पोलिसही चक्रावले आहेत. सदर प्रकरणाचा तपास करण्याचं मोठं आव्हान सध्या पोलिसांसमोर आहे. बॉम्ब कुणी बनवला, कुठून आला, इथे तो ठेवण्यामागे त्याचा हेतू काय, या सगळ्या प्रश्नांची उकल पोलिसांना करावी लागणार आहे.

मागील आठवड्यात केवळ अफवा

दरम्यान, मागच्या आठवड्यात औरंगाबादमधील सरस्वती भुवन परिसरातही बॉम्ब आढळल्याची बातमी पसरली होती. पोलिसांनी तपास केला असता तो बॉम्ब नसून पॉवर बँक होती, असे निष्पन्न झाले. त्यामुळे कन्नड शहरात सापडलेली वस्तूही बॉम्बच आहे का, याविषयी शंका होती. आता तपासयंत्रणांनी तो बॉम्बच असल्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं पोलिसांसमोर आता नवं आव्हान उभं राहिलं आहे.

मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.