शाळेपासून 1 किमी अंतरावर असताना विद्यार्थ्यासोबत जे घडलं, त्याने काळजात धस्स!

आनंद सायकवरुन शाळेत जात होता, एक किमी अंतरच बाकी होतं, इतक्यात वाटेत...

शाळेपासून 1 किमी अंतरावर असताना विद्यार्थ्यासोबत जे घडलं, त्याने काळजात धस्स!
काळाचा घालाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 14, 2022 | 11:07 AM

दत्ता कानवटे, TV9 मराठी, औरंगाबाद : पुणे-नगर महामार्गावर (Pune-Nagar Accident) भरधाव कंटेनरने रस्ता ओलांडत असताना एका पादचाऱ्याला चिरडल्याची घटना नुकतीच समोर आली. या थरारक अपघाताचं सीसीटीव्हीदेखील (CCTV Video) काळजी पिळवटून टाकणारं होतं. त्यानंतर आता औरंगाबादमधूनही अपघाताची (Aurangabad Accident) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विद्यार्थ्याला कारने चिरडलं. यात शाळेत जात असलेल्या विद्यार्थ्याचा वाटेतच मृत्यू झाला. या घटनेनं एकच हळहळ व्यक्त केली जातेय.

वैजापूर गंगापूर रस्त्यावरील बाजाठाण फाटा परिसरात अपघात घडल्याची घटना समोर आलीय. या अपघातामध्ये आनंद अशोक जगताप या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जगताप कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळलाय.

नेमका कशामुळे अपघात?

आनंद जगताप हा विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी निघाला होता. तो नेहमीप्रमाणे आपल्या सायकलवरुन शाळेत जात होता. शाळा अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर होती. त्यावेळी एक भरधाव कार काळ बनून आली आणि तिने आनंदचा जीव घेतला.

हे सुद्धा वाचा

खासदी प्रवासी वाहतूक करणाऱ्या भरधाव कारने सायकलवरुन जात असलेल्या आनंद जगताप या विद्यार्थ्याला मागून जोरदार धडक दिली. ही धकड इतकी भीषण होती की शाळकरी विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची ही घटना शाळेत कळल्यानंतर शाळेतील सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. तर मृत विद्यार्थ्या पालकांनी केलेला आक्रोशही काळीज पिळवटून टाकणारा होता.

राज्यातील रस्ते अपघातांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. भरधाव वेगाने गाड्या हाकणं, लेन मोडणं, अतिवेग, ओव्हरटेकिंग या कारणांमुळे अपघाताचं प्रमाण वाढल्याचं जाणकार सांगतात. आता शाळेत जाणाऱ्या एका निष्पाप विद्यार्थ्यावर काळानं घातल्यामुळे दुःख व्यक्त केलं जातंय.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.