Video | अंगावर काटा येईल अशी मारहाण! वृद्धाला काठीनं बदडलं, 2 गट का भिडले?

Aurangabad Fight : Viral Video : बिलोनी गावात राहणारे रहिवासी यांच्यातील असलेला शेतजमिनीचा वाद विकोपाला गेला आणि त्यातूनच ही धक्कादायक घटना घडली. यावेळी दगड, लाठ्या काढ्या आणि बुक्क्यांनी एकमेकांवर प्रहार करण्यात आले.

Video | अंगावर काटा येईल अशी मारहाण! वृद्धाला काठीनं बदडलं, 2 गट का भिडले?
सांगलीतील विट्यात दोन चिमुरड्यांसह विवाहितेची आत्महत्या
Follow us
| Updated on: Feb 05, 2022 | 4:45 PM

औरंगाबाद : वैजापूर तालुक्यातील एका गावात धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा खळबळजनक व्हिडीओ (Shocking video in Aurangabad) थरकाप उडवणारा आहे. या व्हिडीओमध्ये काही जण रक्तबंबाळ झाल्याचं दिसून आलं आहे. तर लाठ्या-काठ्यांनी वृद्धाला अमानुष मारहाणही (Senior citizen beaten) करण्यात आली असल्याचं दिसून आलंय. एका शेतशिवारात ही तुंबळ हाणामारी सुरु आहे. दोन गट आपसांत भिडले असून या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सदरची घटना ही औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातील बिलोनी गावातील असल्याची माहिती समोर आली आहे. या मारहाण प्रकरणी पोलिसांतही (Aurangabad Police) परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून पोलिस याप्रकरणी आता अधिक तपास करत आहेत. दरम्यान, या हाणामारीत जखमी झालेल्यांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींनी जवळच्या घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. तसंच पोलिसांनाही या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतल पोलिस बंदोबस्तही तैनात केला होता.

Aurangabad Crime

औरंगाबादेत मारहाण करताना दोन गट

का झाली तुंबळ हाणामारी?

दोन गटांत झालेल्या तुंबळ हाणामारीचं काण शेतजमिनीचा वाद असल्याचं समोर आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतीचा वाद सुरु होता. बिलोनी गावात राहणारे रहिवासी यांच्यातील असलेला शेतजमिनीचा वाद विकोपाला गेला आणि त्यातूनच ही धक्कादायक घटना घडली. यावेळी दगड, लाठ्या काढ्या आणि बुक्क्यांनी एकमेकांवर प्रहार करण्यात आले. यात दोन्हीही गटातील काहीजण रक्तबंबाळ झाले होते. तर एका वृद्धाला अमानुष मारहाण करण्यात आल्याचं व्हिडीओमध्ये दिसून आलंय.

दोन व्हिडीओ व्हायरल

या धक्कादायक घटनेचे दोन व्हिडीओ व्हायरल झाले असून यातील एक व्हिडीओ 1.07 सेकंदांचा तर दुसरा व्हिडीओ हा 2.22 सेकंदांचा आहे. यातील मोठ्या व्हिडीओमध्ये दगडफेक आणि लाठ्या काठ्यांनी हल्ला करण्यात आल्याचं दिसून आलं आहे. एक वृद्ध माणूस जमिनीवर बसला असून त्याचा पाठमोरा भाग दिसतोय. यात त्यानं आपला झब्बा पाठीमागून वर केला असून त्याच्यावर दगडफेक आणि काठीनं मारहाण सुरु आहे. तर दुसऱ्या एक व्हिडीओमध्ये एक मुलगी एका पुरुषाला मारहाण करण्यापासून रोखायला जाण्यापासून मज्जाव करताना दिसतेय.

पाहा व्हिडीओ

दरम्यान, या संपूर्ण तुंबळ हाणामारीवेळी दोन्ही गटांकडून एकमेकांना शिव्या आणि बाचाबाची सुरु असल्याचं दिसून आलंय. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन अखेर पोलिसांनी याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हा दाखल केला आहे. आता याप्रकरणी पुढे काय कारवाई केली जाते, हे पाहणं महत्त्वाचंय.

संबंधित बातम्या :

Aurangabad | मुजोर रिक्षाचालकांनी औरंगाबादेत गुंडगिरी, प्रवाशाला बेदम मारहाण, भररस्त्यात राडा!

इsssश! धावत्या बाईकवर नको ते चाळे करणारे ते दोघं कोण? Viral Videoनं चर्चांना उधाण

लेकरांना घेऊन महिला आत्महत्येसाठी शिवारात गेली पण पोलीसही तातडीनं पोहोचले, औरंगाबादमध्ये नेमके काय घडले?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.