दोन लाखांची बाईक नव्या नवरीनं पळवली, फसवणुकीची तक्रार सांगताना…

Crime News : एका शेतकऱ्याची फसवणूक झाल्याची घटना पोलिस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे. पोलिस त्या तरुणीचा शोध घेत आहेत. विशेष म्हणजे २० दिवसात तरुणाकडे असलेलं सगळं घेऊन ती तरुणी पसार झाली आहे.

दोन लाखांची बाईक नव्या नवरीनं पळवली, फसवणुकीची तक्रार सांगताना...
aurangabadImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 22, 2023 | 9:41 AM

औरंगाबाद : लग्नाचं नाटक केल, २० दिवसात जेवढं गरजेचं आहे तितकं सोबत घेतलं आणि समृध्दी महामार्गावरुन (samruddhi mahamarg) पोबारा केल्याचं एक प्रकरण सध्या उजेडात आलं आहे. विशेष म्हणजे ज्या तरुणाची फसवणूक झाली आहे. तो तरुण शेतकरी (FARMER) असल्याची माहिती समजली आहे. त्या तरुणाचं लग्न होत. त्यामुळे त्या तरुणाने दोन लाख रुपये देऊन लग्न केलं आहे. ज्या लोकांनी या प्रकरणात मध्यस्थी केली, त्याचा पोलिस शोध घेत आहेत. मागच्या काही दिवसात महाराष्ट्रात (MAHARASHTRA NEWS IN MARATHI) अशी अनेक प्रकरण उजेडात आली आहेत. बुलढाण्यात मागच्या महिन्यात फसवणूक करणारी एक टोळी ताब्यात घेतली आहे.

घटनेमुळं परिसरात खळबळ माजली

खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी येथील शेतकरी तरुणाला मुलगी मिळत नसल्यामुळे एका मध्यस्थीच्या माध्यमातून दोन लाख रुपये देऊन लग्न केलं होतं. नव्या नवरीने दोन लाख रुपयांची बाईक आणि घरातील दागिणे घेऊन मित्रासोबत पसार झाल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल झाली आहे. पोलिस सीसीटिव्हीचा आधार घेत या प्रकरणाचा तपास करीत आहेत. या घटनेमुळं परिसरात खळबळ माजली असून नागरिक संतप्त झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार

वीस दिवसातच नववधू दागिने तसेच नवीन घेतलेली मोटरसायकल घेऊन साथीदारासह समृद्धी महामार्गाने पसार झाली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मुलीकडच्या घरचे गरीब असल्यामुळे त्यांना लग्न करण्यासाठी दोन लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगून मुलाकडील कुटुंबीयांना विश्वास दाखवला. त्यांनी पैशाची तयारी केली. मुलीकडच्या लोकांना पैसे सुध्दा दिले आहेत.

हे सुद्धा वाचा

प्रियकरासोबत पलायन केले

पैसे देण्याचं ठरल्यावर दोन्ही कुटुंबियांनी वीस दिवसांपूर्वी तरुणांचा विवाह वेरूळ येथे मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थिती लावून देण्यात आला. मोठ्या थाटात पार पडलेल्या विवाहाला मुलाच्या घरच्यांनी मुलीला मोठ्या प्रमाणात दागिणे घातले आहेत. तेचं दागिने, नवी बाईक घेऊन मुलीने प्रियकरासोबत पलायन केले आहे. समृद्धी महामार्गावर दुचाकीबंदी असतानाही महामार्गावरून ही जोडी पसार झाल्याची माहिती समजली आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.