Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

याला म्हणतात अद्दल घडवणे! जिथे गुंडगिरी करायचे तिथेच धिंड काढली

पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांनी गुंडांच्या टोळीची भर शहरात धिंड काढली. वर्चस्व वादातून गुंडांच्या दोन टोळ्यांमध्ये तुफान राडा झाला होता. पोलिसांनी या आरोपींना आता चांगलाच धडा शिकवला आहे.

याला म्हणतात अद्दल घडवणे! जिथे गुंडगिरी करायचे तिथेच धिंड काढली
Follow us
| Updated on: Jul 23, 2023 | 12:07 AM

औरंगाबाद | 22 जुलै 2023 :कानून के हाल लंबे होते है’, हा डायलॉग आपण अनेक हिंदी चित्रपटांमध्ये ऐकला आहे. पोलिसांचं काम हे खरंच आव्हानात्मक असतं. कारण या जगामध्ये विकृत आणि राक्षसी प्रवृत्तींना काम पोलीस अतिशय योग्य पद्धतीने करतात. गुन्हेगार कितीही चपळ असला तरी त्याला शोधून काढण्यात आणि त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश मिळतंच. पोलिसांनी अशा शेकडो, हजारो गुन्हेगारांना पकडलं आहे. पण तरीही काही जण गुन्हेगारी सोडत नाहीत. याउलट ते सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांचं हे दहशत माजवण फार काळ टिकत नाही. कारण पोलीस त्यांचा अतिशय योग्य पद्धतीने बंदोबस्त करतात. या गोष्टींचा प्रत्यय आज औरंगाबादमध्ये बघायला मिळाला आहे.

टोळीची परिसरात दहशत

पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांनी गुंडांच्या टोळीची भर शहरात धिंड काढली. वर्चस्व वादातून गुंडांच्या दोन टोळ्यांमध्ये तुफान राडा झाला होता. उज्जैन येथील दुर्लभ कश्यप या गुंडाला फॉलो करणारी ही टोळी आहे. गेल्यावर्षी त्यांनी एका चौकाला कश्यपचे नाव दिले होते. तेव्हापासून या टोळीची दहशत आहे.

पोलिसंनी नेमकी कशी अद्दल घडवली?

या प्रकरणात पुंडलिकनगर पोलिसांनी कश्यप टोळीच्या पाच आणि विरोधी टोळीच्या एक अशा सहा जणांना अटक केली. पोलिसांनी आरोपींना चांगलीच अद्द घडवली आहे. ते ज्या ठिकाणी दादागिरी, गुंडगिरी करायचे त्याच भागात पोलिसांनी त्यांची धिंड काढली. या आरोपींना असाप्रकारे फिरविल्याने पोलीस निरीक्षक राजश्री आडे आणि पुंडलिकनगर पोलिसांचे नागरिकांनी आभार मानले.

आरोपी विशाल गवळीच्या आईने केला मोठा आरोप
आरोपी विशाल गवळीच्या आईने केला मोठा आरोप.
महाराष्ट्राचे भूषण गवई देशाचे 52वे सरन्यायाधीश होणार
महाराष्ट्राचे भूषण गवई देशाचे 52वे सरन्यायाधीश होणार.
राणे -ठाकरेंमध्ये तापलं कोंबडीवड्यांचं राजकारण
राणे -ठाकरेंमध्ये तापलं कोंबडीवड्यांचं राजकारण.
औरंगजेबाच्या थडग्याला समाधीचा दर्जा द्यायचा होता तर दंगली का घडवल्या?
औरंगजेबाच्या थडग्याला समाधीचा दर्जा द्यायचा होता तर दंगली का घडवल्या?.
अजितदादांनी घेतला सूरज चव्हाणच्या घरच्या कामाचा आढावा
अजितदादांनी घेतला सूरज चव्हाणच्या घरच्या कामाचा आढावा.
कल्याण अत्याचार प्रकरण; आरोपीने कारागृहात स्वत:ला संपवलं
कल्याण अत्याचार प्रकरण; आरोपीने कारागृहात स्वत:ला संपवलं.
शाह स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी, 'त्या' 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?
शाह स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी, 'त्या' 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?.
अष्टविनायकाच्या दर्शनाला जाताय? नीट कपड्यात जा..कारण आता ड्रेसकोड लागू
अष्टविनायकाच्या दर्शनाला जाताय? नीट कपड्यात जा..कारण आता ड्रेसकोड लागू.
गर्लफ्रेंडला टाकलं बॅगेत अन् आणलं बॉईज हॉस्टेलात, पुढे जे झालं त्यावर
गर्लफ्रेंडला टाकलं बॅगेत अन् आणलं बॉईज हॉस्टेलात, पुढे जे झालं त्यावर.
तटकरेंच्या घरी जेवणाचं आमंत्रण, गोगावले जाणार की नाही? स्पष्ट म्हणाले
तटकरेंच्या घरी जेवणाचं आमंत्रण, गोगावले जाणार की नाही? स्पष्ट म्हणाले.