Azan on Loudspeaker : लाऊडस्पीकरवरील अजानमुळे इतर धर्मियांच्या मूलभूत अधिकारांवर गदा येत नाही : कर्नाटक उच्च न्यायालय

संविधानाच्या कलम 25(1)नुसार सर्व नागरिकांना त्यांचा धर्म स्वीकारण्याचा आणि धर्माचा प्रचार करण्याचा मूलभूत अधिकार आहे, असे उच्च न्यायालयाने मंगळवारच्या सुनावणीदरम्यान नमूद केले.

Azan on Loudspeaker : लाऊडस्पीकरवरील अजानमुळे इतर धर्मियांच्या मूलभूत अधिकारांवर गदा येत नाही : कर्नाटक उच्च न्यायालय
पीएफआय प्रकरणातील संशयित आरोपींच्या कोठडीत वाढImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 24, 2022 | 3:09 AM

बंगळुरू : मशिदींवरील लाऊडस्पीकरवर अजान (Azan on Loudspeaker) देण्यावरून मध्यंतरी संपूर्ण देशभरात मोठा वाद निर्माण झाला होता. अनेकांनी अजानवर आक्षेप घेतला. त्यामुळे त्याचे राजकीय क्षेत्रातही पडसाद उमटले होते. याचदरम्यान कर्नाटक उच्च न्यायालया (Karnataka High Court)ने मशिदींवरील लाऊडस्पीकरवर अजान देण्याच्या मुद्द्यावर महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. मशिदींवरील लाऊडस्पीकरवर अजान दिल्यामुळे इतर धर्मांतील नागरिकांच्या मूलभूत अधिकारां (Fundamental Rights)चे कुठल्याही प्रकारे उल्लंघन होत नाही, असे मत कर्नाटक उच्च न्यायालयाने मंगळवारी व्यक्त केले. लाऊडस्पीकरवर अजानसंदर्भात उच्च न्यायालयात एका जनहित याचिका दाखल झाली आहे. त्या याचिकेवर सुनावणी करताना प्रभारी मुख्य न्यायमूर्ती आलोक अराधे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने मूलभूत अधिकारांचा मुद्दा अधोरेखित केला.

मशिदींना लाऊडस्पीकरवर अजान देण्यास बंदी नाही

कर्नाटक उच्च न्यायालयाने मशिदींना लाऊडस्पीकरवर अजान देण्यास बंदी घालण्यास नकार दिला आहे. संविधानाच्या कलम 25(1)नुसार सर्व नागरिकांना त्यांचा धर्म स्वीकारण्याचा आणि धर्माचा प्रचार करण्याचा मूलभूत अधिकार आहे, असे उच्च न्यायालयाने मंगळवारच्या सुनावणीदरम्यान नमूद केले. अजान ही मुस्लिमांची अत्यावश्यक धार्मिक प्रथा आहे. मात्र, अजानच्या आवाजाचा इतर धर्माचे पालन करणाऱ्यांना त्रास होतो, असा दावा करीत बंगळुरू येथील रहिवासी मंजुनाथ एस. हलावर यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर मंगळवारी प्रभारी मुख्य न्यायमूर्ती आलोक अराधे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर सुनावणी झाली.

मशिदींमध्ये लाऊडस्पीकरशी संबंधित ध्वनी प्रदूषण नियम लागू करा!

मशिदींना लाऊडस्पीकरशी संबंधित ध्वनी प्रदूषण नियम लागू करा तसेच त्या नियमांचे मशिदींकडून कशाप्रकारे पालन केले जात आहे, याचा अहवाल सादर करा, असे निर्देश कर्नाटक उच्च न्यायालयाने संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्यघटनेच्या कलम 25 आणि 26 मध्ये सहिष्णुतेच्या तत्त्वाला मूर्त रूप देण्यात आले आहे. हे तर भारतीय सभ्यतेचे वैशिष्ट्य आहे. राज्यघटनेचे कलम 25(1) लोकांना त्यांच्या धर्माचा मुक्तपणे प्रचार आणि प्रसार करण्याचा मूलभूत अधिकार प्रदान करते. राज्यघटनेच्या कलम 25(1) मध्ये सर्व नागरिकांना त्यांचा धर्म स्वीकारण्याचा आणि प्रचार करण्याचा मूलभूत अधिकार आहे. मात्र हा पूर्ण अधिकार नाही. सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता आणि आरोग्याच्या बाबतीत राज्यघटनेच्या भाग तीनच्या इतर तरतुदींनुसार निर्बंधांचे पालन करावे लागेल, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. (Azan on loudspeaker does not infringe on fundamental rights of other religions: Karnataka court)

हे सुद्धा वाचा

वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.