बाबा सिद्दीकींच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट, अनमोल बिश्नोई Wanted घोषित

बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या एकूण 26 आरोपींना आज मकोका न्यायालयात हजर करण्यात आले होते. या 26 पैकी 8 आरोपींना न्यायालयाने 7 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर उर्वरित आरोपींची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.

बाबा सिद्दीकींच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट, अनमोल बिश्नोई Wanted घोषित
बाबा सिद्दिकी
Follow us
| Updated on: Dec 04, 2024 | 10:23 AM

Baba Siddiqui Murder Case :  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर 2024 ला गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकींच्या हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होते. या हत्येप्रकरणी पोलिसांनी काही आरोपींना अटक देखील केली होती. आता बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या एकूण 26 आरोपींना आज मकोका न्यायालयात हजर करण्यात आले होते. या 26 पैकी 8 आरोपींना न्यायालयाने 7 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर उर्वरित आरोपींची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी अनमोल बिश्नोईचे नाव समोर आल्यानंतर आरोपींविरुद्ध मकोकाची गंभीर कलमे लावण्यात आली होती. आता यातील 8 आरोपींना 7 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

तपासासाठी पोलीस कोठडीची गरज, मुंबई पोलिसांची मागणी

बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी एक महत्त्वाची सुनावणी पार पडली. यावेळी विशेष मकोका न्यायालयाचे न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी मुख्य हल्लेखोर असलेल्या शिवकुमार गौतमसह 8 आरोपींना ७ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या सुनावणीवेळी मुंबई पोलिसांनी न्यायालयाला बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणाच्या चौकशीदरम्यानचे काही महत्त्वाचे मुद्दे सांगितले. या हत्येचा मुख्य सूत्रधार अनमोल बिश्नोई आहे. त्यानेच बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट रचला होता. तो इतर आरोपींना आर्थिक मदत करत होता.

अनमोल बिश्नोईकडे हे पैसे कुठून आले, त्याचा वापर कसा होत होता, याचा अधिक तपास सध्या सुरु आहे. अनमोलने एका ॲपद्वारे या सर्व आरोपींशी संपर्क साधला होता, अशी माहिती समोर आली आहे. याची संपूर्ण माहिती गोळा करण्यासाठी अटक करण्यात आलेल्या आरोपींची अधिक चौकशी करणं गरजेचे आहे. त्यासाठी आरोपींच्या कोठडीची गरज आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने १२ ऑक्टोबर रोजी बाबा सिद्दीकी हत्याकांडाच्या संबंधात कथित मुख्य हल्लेखोर शिवकुमार गौतमसह आतापर्यंत २६ आरोपींना अटक केली आहे.

26 आरोपींना अटक

दरम्यान बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर 2024 ला गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली. आतापर्यंत याप्रकरणी २६ आरोपींना अटक करण्यात येईल. याप्रकरणी फरार असलेला आरोपी शिवकुमार देखील आज पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही मुंबईत बाबा सिद्दिकीची रेखी करत होतो आणि 12 ऑक्टोबरला  रात्री योग्य वेळ मिळताच आम्ही बाबा सिद्दिकीची हत्या केली, अशी माहिती चौकशीदरम्यान एका आरोपीने दिली होती.

या घटनेनंतर पोलिसांनी दोन आरोपांनी अटक केली होती. तो आरोपी फरार झाला होता. शिवकुमार असं फरार आरोपीचं नाव होते.  हा बाबा सिद्दीकी यांची हत्या प्रकरणातील मुख्य शूटर आहे. तो थेट लॉरेन्स गँग सिंडिकेटच्या संपर्कात होता. लॉरेन्स गँगच्या सर्व सूचना त्याच्या मोबाईलवर येत होत्या. बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर मध्य प्रदेशातील ओंकारेश्वरला जाणार होते. तिथे त्याला लॉरेन्स गँगच्या एका गुंडाला भेटायचे होते. मात्र यादरम्यानच त्याला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली.

'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.