Baba Siddiqui Murder : सलमानसोबतची जवळीक जीवावर बेतली ? एपी ढिल्लनच्या घरावरही बिश्नोई गँगने केला होता गोळीबार

अजितदादा गटाचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या होऊन पाच दिवस उलटले असून याप्रकरणी आत्तापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींच्या चौकशीतून अनेक महत्वाचे खुलासे होत आहेत. याप्रकरणी पोलीस कसून तपास करत असून त्यांना काही महत्वाचे पुरावेही सापडले आहेत. सिद्दीकी यांची हत्या झालेल्या स्थळापासून काही अंतरावर पोलिसांना एक काळी पिशवी सापडली, त्यात काही कागदपत्र सापडली. तसेच हत्याकांडातील आरोपी धर्मराज कश्यप याची बाईकही पोलिसांना सापडली असून त्यावरूनचे आरोपींनी सिद्दीकी यांची रेकी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Baba Siddiqui Murder : सलमानसोबतची जवळीक जीवावर बेतली ? एपी ढिल्लनच्या घरावरही बिश्नोई गँगने केला होता गोळीबार
सलमान खानशी जवळीक सिद्दीकींच्या जीवावर बेतली ?
Follow us
| Updated on: Oct 16, 2024 | 9:51 AM

दसऱ्याच्या दिवशी, शनिवार 12 ऑक्टोबर रोजी वांद्रे येथे बाबा सिद्दीकी याची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. रिक्षातून आलेल्या तिघांनी स्मोक बॉम्ब फोडून धूर केला आणि त्यानंतर सिद्दीकी यांच्यावर बेछूट गोळीबार केला. लीलावत रुग्णालयता दाखल करण्यात आलेल्या सिद्दीकी यांचा उपचारांदरम्यानच मृत्यू झाला. याप्रकरणामुळे मुंबईसह राज्यभरात खळबळ माजली. माजी मंत्री असलेले सिद्दीकी हे केवळ राजकारणी म्हणूनच प्रसिद्ध नव्हते तर बॉलिवूडमध्ये, चित्रपटसृष्टीतही त्यांचे अनेक कलाकांराशी चांगले संबंध होते. अभिनेता सलमान खान याच्याशी तर त्यांची कित्येक वर्षांपासून गाढ मैत्री होती. सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीत समलान दरवर्षी आवर्जून हजेरी लावायचा. तर सलमानच्या कठीण काळात सिद्दीकी त्याच्यासोबत आणि कुटुंबियांसोबत नेहमी ठामपणे उभे होते. मात्र सलमान खान याच्याशी असलेली जवळीक हीच सिद्दीकी यांच्या जीवावर बेतली का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सलामनशी जवळीक असल्यामुळेच त्यांना टार्गेट करण्यात आलं, त्यांची हत्या झाली असावी. मुंबई पोलिसांनी आत्तापर्यंत केलेल्या तपासानंतर हा प्राथमिक निष्कर्ष निघत आहे.

सिद्दीकींचे सलमानशी चांगले संबंध

अभिनेता सलमान खान खान याला सतत धमक्या येत असतात. अनेक वर्षांपूर्वी काळवीटाची शिकार केल्यानंतर तो बिश्नोई गँगच्या रडारवर आला होता, आणि त्याला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून अनेकवेळा जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. एप्रिल महिन्यात त्याच्या घरावर गोळीबारही करण्यात आला होता. यामध्येही बिश्नोई गँगचा हात असल्याचे तपासात समोर आले होते. आणि आता याच बिश्नोई गँगने सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. बाबा सिद्दीकी यांची सलमानसोबत जवळी होती, त्यांनी सलमानसोबत सामाजिक तसेच आर्थिक व्यवहार केल्यानेच बिश्नोई गँगने सिद्दीकी यांना टार्गेट करत त्यांची हत्या केली असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

यापूर्वी प्रसिद्ध गायक ए.पी. ढिल्लन याच्या घराबाहेरही गोळीबार झाला होता. ए.पी. ढिल्लन हाँ अभिनेता सलमान खान याच्यासोबत एका प्रोजेक्टवर काम करत होता. त्याचे सलमानशी प्रोफेशनल संबंध असल्यानेच बिश्नोई गँगने त्याच्या घराबारे गोळीबार केल्याचा अंदाज व्यकत होत आहे. तर माजी मंत्री असलेले बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर बिश्नोई गँगकडून दहशत पसरवण्याचा हा प्रयत्न असल्याचा मुंबई पोलिसांचा अंदाज आहे.

सिद्दीकी यांना टार्गेट कसं करण्यात आलं ?

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आत्तापर्यंत चार आरोपींना अटक केली असीन दोघे शूटर्स तर एक हँडलर आणि चौथा आरोपी कट रचण्यास मदत करत होता, असे समोर आले आहे. आतापर्यंत अटक करण्यात आलेले आरोपी हे वेगवेगळ्या पद्धतीने बिश्नोई गँगच्या संपर्कात होते. याप्रकरणात सिद्दिकी यांचं नाव टार्गेट म्हणून कसं ठरवण्यात आलं याचा मुंबई पोलिसांकडून तपास सुरू आहे. हत्येचा कट रचताना , टार्गेट सांगताना सिद्दिकी यांचा एक फोटो आणि एक बॅनरवरील फोटो आरोपींना देण्यात आला होता, तो फोटो कोणी दिला याचाही तपास सुरू आहे. या सगळ्या प्रकरणात मास्टरमाईंड म्हणून ज्याने भूमिका बजावली तो झिशान अख्तर मुंबई पोलिसांच्या रडारवर असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.

दोन महिन्यांआधीच पेटला होता एसआरएचा वाद

दरम्यान बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या दोन महिने आधीच एसआरएचा वाद पेटला होता. ज्ञानेश्वर नगर येथील लोकांना घेऊन आंदोलन केल्याप्रकरणी बाबा सिद्दीकी यांचा मुलगा, आमदार झिशान सिद्दीकी यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. सरकारी कामात अडथळा आणि बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी झिशान सिद्दीकी यांच्याविरोधात हाँ गुन्हा दाखल करण्यात आला होता. एसआरए प्रकल्पाच्या पुनर्विकासाबद्दल सिद्दिकी पितापुत्रांनी स्थानिकांना घेऊन आंदोलन उभं केलं होते . पोलिस या अँगलची पहिल्या दिवसापासून पडताळणी करत आहेत, मात्र आत्तापर्यंत याप्रकरणी काही हाती लागले नसल्याची माहिती समोर आली आहे.

त्या बॅगमध्ये सापडलं आरोपीचं आधारकार्ड

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर चार दिवसानी ( मंगळवारी) पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले. बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली त्या ठिकाणापासून 100 मीटर अंतरावर पोलिसांनी एक काळी बॅग सापडली . त्यामध्ये एक बदूक आणि काही कागदपत्र सापडली होती. ती कागदपत्र म्हणजे सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करणारा आरोपी शिवकुमार गौतमचे आधारकार्ड असल्याचे समोर आले आहे. आरोपी शिवकुमारनेच बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि फरार झाला होता. मात्र फरार होण्यापूर्वी आरोपी शिवकुमारने बंदूक आणि स्वतचे आधारकार्ड असलेली बॅग फेकली होती. पोलिसांना आतापर्यंत तीन पिस्तुल सापडली असून लागले आहेत त्यापैकी दोन धर्मराज कश्यप आणि गुरुनैल सिंग याच्याकडे सापडली.

Non Stop LIVE Update
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.
मी शिंदे साहेबांना वाशीतच सांगितले होते...काय म्हणाले मनोज जरांगे
मी शिंदे साहेबांना वाशीतच सांगितले होते...काय म्हणाले मनोज जरांगे.
अजित पवार गटातले आमदार राजेंद्र शिंगणे हाती तुतारी घेणार ?
अजित पवार गटातले आमदार राजेंद्र शिंगणे हाती तुतारी घेणार ?.
भारत आणि कॅनडा संबंध आणखी बिघडले,बिष्णोई टोळीशी काय कनेक्शन ?
भारत आणि कॅनडा संबंध आणखी बिघडले,बिष्णोई टोळीशी काय कनेक्शन ?.
दिल्लीत महायुतीच्या जागांचा फॉर्म्युला ठरणार,अमित शाहसोबत अंतिम बैठक
दिल्लीत महायुतीच्या जागांचा फॉर्म्युला ठरणार,अमित शाहसोबत अंतिम बैठक.
आमचं सरकार आलं तर बहि‍णींना तीन हजार रुपये देणार - गुलाबराव पाटील
आमचं सरकार आलं तर बहि‍णींना तीन हजार रुपये देणार - गुलाबराव पाटील.
'लाडकी बहीण योजना' बंद करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम - मुख्यमंत्री
'लाडकी बहीण योजना' बंद करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम - मुख्यमंत्री.
ज्यांचा गृहमंत्री जेलमध्ये गेला ते आम्हाला कायदा...काय म्हणाले फडणवीस
ज्यांचा गृहमंत्री जेलमध्ये गेला ते आम्हाला कायदा...काय म्हणाले फडणवीस.