Baba Siddiqui Murder : सिद्दीकींचे मारेकरी गांजाच्या नशेत ? पोलिसांना सापडला मोठा पुरावा

माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची वांद्रे येथील निर्मलनगरमध्ये शनिवारी रात्री हत्या करण्यात आली. रिक्षातून आलेल्या तीन हल्लेखोरांना फटाक्यांच्या आवाजाचा फायदा घेत, स्मोक बॉम्ब फोडून धूर केला आणि सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला. त्यातील तीन गोळ्या सिद्दीकी यांना लागल्या आणि लीलावती रुग्णालयात नेल्यावर त्यांचा मृत्यू झाला. या हत्येनंतर तीनही आरोपी पळून गेले, मात्र दोघांना पकडण्यात पोलिसांना यश मिळाले.

Baba Siddiqui Murder : सिद्दीकींचे मारेकरी गांजाच्या नशेत ? पोलिसांना सापडला मोठा पुरावा
बाबा सिद्दीकी यांची हत्या
Follow us
| Updated on: Oct 16, 2024 | 10:22 AM

माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची वांद्रे येथील निर्मलनगरमध्ये शनिवारी रात्री हत्या करण्यात आली. रिक्षातून आलेल्या तीन हल्लेखोरांना फटाक्यांच्या आवाजाचा फायदा घेत, स्मोक बॉम्ब फोडून धूर केला आणि सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला. त्यातील तीन गोळ्या सिद्दीकी यांना लागल्या आणि लीलावती रुग्णालयात नेल्यावर त्यांचा मृत्यू झाला. या हत्येनंतर तीनही आरोपी पळून गेले, मात्र दोघांना पकडण्यात पोलिसांना यश मिळाले. धर्मराज कश्यप आणि गुरमेल सिंग अस दोन्ही आरोपींचे नाव आहे तर शिवकुमार यादव हा तिसरा आरोपी अद्याप फरार आहे. तसेच हँडलर प्रवीण लोणकर आणि मारेकऱ्यांना पैसा व इतर गोष्टी पुरवणारा आरोपी हरीशकुमार हाही अटकेत असून पोलिसांच्या ताब्यातील आरोपींची संख्या आता चार झाली आहे.

त्यांच्या चौकशीतून अनेक महत्वाच्या बाबी समोर आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सिद्दीकी यांच्या हत्येचा कट तीन महिन्यांपूर्वीच पुण्यात रचण्यात आला होता. धर्मराज, गुरमेल आणि शिवकुमार या तिनही हल्लेखोरांनी कुर्ला येथे एक खोली भाड्याने घेतली होती. त्यानंतर त्यांनी महिनाभरापेक्षा अधिक काळ सिद्दीकी यांची रेकी केली, त्यांच्या घरावरही नजर ठेवली होती, अशी माहिती समोर आली आहे.

स्मोक बॉम्ब फोडून गोळीबार

हे सुद्धा वाचा

शनिवार 12 ऑक्टोबर रोजी वांद्र्यातील निर्मलनगर येथे झिशान सिद्दीकीच्या ऑफीसबाहेरच बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दसऱ्यानिमित्त तिथे फटाके फोडण्यात येत होते, त्याच वेळी हल्लेखोर तेथए रिक्षातू आले. आजूबाजूच्या गोंधळाचा फयाद घेत त्यांनी स्मोक बाँब फोडला, धूर केला आणि बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडल्या, त्यांनी 5-6 राऊंड फायर केले. त्यापैकी 3 गोळ्या सिद्दीकी यांना लागल्या, तर एक गोळी तेथे उभ्या असलेल्या एका तरूणाला लागली.

गोळीबार होताच गोंधळ माजला आणि त्याचा फायदा घेऊन हल्लेखोर पळून गेले व गर्दीत मिसळले. शिवकुमार हा फरार होण्यात यशस्वी झाला पण धर्मराज आणि गुरमेल हे मात्र थोड्या अंतरावर पोलिसांच्या ताब्यात सापडले आणि त्यांना अटक करण्यात आली.

आरोपी गांजाच्या नशेत होते ?

याप्रकरणी अटक केलेल्या आरोपींची पोलीस कसून चौकशी करत आहे. हे हल्लेखोर ज्या भाड्याचा घरात राहत होते, तेथे पोलिसांनी तपास केला. त्यावेळी तपास पथकाला तेथून गांजा पावडरचे अंश सापडले आहेत. आरोपींना गांजा कोणी पुरवला, त्या व्यक्तीचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. धर्मराज कश्यप, गुरमेल सिंग आणि शिवकुमार गौतम या तिघांनाही गाजांचा वापर करण्याची सवय होती. सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला तेव्हाही ते गांजाच्या नशेत होते का याचाही पोलिस तपास करत आहेत. या हल्ल्याच्या 20 दिवस आधीच त्या तिघांनी विनोबा भावे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुर्ला पश्चिम येथील मायकल हायस्कूलजवळील पटेल चाळीत भाड्याने घर घेतले होते अशी माहितीही मिळाली आहे.

लग्नात गोळीबार रून शिवकुमारने घेतलं बंदूक चालवण्याचं प्रशिक्षण

दरम्यान या हत्याकांडातील प्रमुख आरोपी, शिवकुमार गौतम यानेच सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर गर्दीचा फायदा घेत तो घटनास्थळावरून निसटला आणि फरार झाला. त्याच्यासंदर्भात एक महत्वाची माहिती पोलिसांना मिळाली आहे. आरोपी शिवकुमारने मोठमोठ्या लग्नात हवेत गोळीबार करून बंदूकीच प्रशिक्षण घेतलं, असा खुलासा इतर आरोपींनी पोलीस चौकशीत केला आहे. दोन आरोपींनी पोलीस चौकशीत दिलेल्या माहितीनुसार आरोपी शिवकुमार हा सेलिब्रिटीच्या आणि मोठ्या लोकांच्या लग्नात हवेत गोळीबार करण्याचे काम करायचा. शिवकुमारने याआधी बंदूक वापरण्याचं प्रशिक्षण असंच घेतलं असल्याची माहिती दोन्ही आरोपींनी दिली.

त्या काळ्या बॅगमध्ये सापडलं आरोपीचं आधारकार्ड

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर चार दिवसानी ( मंगळवारी) पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले. बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली त्या ठिकाणापासून 100 मीटर अंतरावर पोलिसांनी एक काळी बॅग सापडली . त्यामध्ये एक बदूक आणि काही कागदपत्र सापडली होती. ती कागदपत्र म्हणजे सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करणारा आरोपी शिवकुमार गौतमचे आधारकार्ड असल्याचे समोर आले आहे. आरोपी शिवकुमारनेच बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि फरार झाला होता. मात्र फरार होण्यापूर्वी आरोपी शिवकुमारने बंदूक आणि स्वतचे आधारकार्ड असलेली बॅग फेकली होती. पोलिसांना आतापर्यंत तीन पिस्तुल सापडली असून लागले आहेत त्यापैकी दोन धर्मराज कश्यप आणि गुरुनैल सिंग याच्याकडे सापडली.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.