Baba Siddiqui Murder : हत्येपूर्वी स्मोक बॉम्ब फोडून धूर, नंतर सटासट गोळ्या झाडल्या; बाबा सिद्दीकींच्या मारेकऱ्यांचा फूलप्रूफ प्लान
वांद्रे येथील निर्मलनगर मध्ये शनिवारी रात्री सिद्दीकी यांची तिघांनी हत्या केली. बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान याच्या ऑफीसबाहेरच हा गोळीबार झाला. या हत्येसाठी मारेकऱ्यांनी फूलप्रूफ प्लानिंग केले होते असे समजते. त्यांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर पाळत ठेवण्यात आली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री वांद्रे येथून निर्घृण हत्या करण्यात आली. तीन आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार केल्या, त्यापैकी तीन सिद्दीकी यांना लागल्या तर एक त्यांच्यासोबत असलेल्या आणखी एका इसमाला लागली. गंभीर जखमी अवस्थेतील सिद्दीकी यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले खरे, पण तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. बाबा सिद्दीकी यांच्यावर दोन बंदुकीतून एकूण सहा राऊंड फायर करण्यात आले. त्यापैकी तीन गोळ्या बाबा सिद्दिकी यांच्या छातीत लागल्या. बाबा सिद्दीकी यांची कार बुलेटप्रुफ असूनही गोळी काचेत घुसली होती. सिद्दीकी यांच्या हत्येमुळे फक्त मुंबईतच नव्हे तर संपूर्ण राज्यातही प्रचंड खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत तिघांना अटक केली असून आणखी फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
अटक करण्यात आलेल्यांपैकी दोघे हे सिद्दीकी यांच्यावर थेट गोळीबार करणारे आहेत. करनैल सिंह आणि धर्मराज कश्यप असे त्या आरोपींचे नाव असून त्यांच्यासह असलेला तिसरा आरोपी मात्र अजून फरार आहे. तर काल पुण्यातून पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली. प्रवीण लोणकर असे त्याचे नाव असून सिद्दीकी हत्याप्रकरणातील संशयित सूत्रधार शुभम लोणकरचा भाऊ प्रवीण लोणकर याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुण्यातून अटक केली. प्रवीण लोणकर आणि त्याचा भाऊ शुभम या दोघांनीच सिद्दीकी यांच्या हत्येसाठी धर्मराज कश्यप आणि शिवानंद या तिसऱ्या आरोपीला निवडल्याचा संशय आहे.
गोळ्या चालवण्यापूर्वी स्मोक बॉम्ब फोडून केला धूर
वांद्रे येथील निर्मलनगर मध्ये शनिवारी रात्री सिद्दीकी यांची तिघांनी हत्या केली. बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान याच्या ऑफीसबाहेरच हा गोळीबार झाला. या हत्येसाठी मारेकऱ्यांनी फूलप्रूफ प्लानिंग केले होते असे समजते. त्यांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर पाळत ठेवत, त्याच्या जाण्या-येण्याच्या वेळा, कुठे कधी असतात या सर्व गोष्टींची नोंद ठेवली होती. शनिवारी रात्री सिद्दीकी यांची हत्या करण्यापूर्वीही हल्लेखोरांन व्यवस्थित प्लानिंग केलं होतं अशी माहिती समोर आली आहे.आरोपींकडून स्मोक बॉम्बचा वापर करण्यात आला होता, तसेच आरोपी शिवकुमार यानेच सर्वात आधी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडल्या अशी माहिती चौकशीतून समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तिनही आरोपींनी सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडण्यापूर्वी आजूबाजूला धूर करण्यासाठी स्मोक बॉम्बचा वापर केला होता. स्मोक बॉम्ब वापरून आजूबाजूला धूर करून टार्गेट संपवण्याचा आरोपींचा प्लॅन होता. त्यानुसार आरोपींनी आधी देवीच्या विसर्जन मिरवणुकीचा आधार घेत स्मोक बॉम्ब फोडला आणि मग सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडल्या. तिनही आरोपींपैकी शिवकुमारने आधी गोळ्या झाडल्याच चौकशीत समोर आलं आहे.
दोन्ही आरोपींना 21 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी
दरम्यान या हत्याप्रकरणात अटक करण्यात आलेले दोन आरोपी करनैल सिंह आणि धर्मराज कश्यप या दोघांना 21 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. तर पुण्यातून अटक केलेल्या प्रवीण लोणकरला आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे. प्रवीण लोणकर हा शुभम लोणकरचा भाऊ आहे. फेसबुकवर कथित स्वरूपात बिश्नोई गँगकडून पोस्ट टाकून शुभम उर्फ शुभू लोणकर महाराष्ट्र या नावाने जबाबदारी स्वीकारली होती. त्यानतर पोलिसांनी पुण्यातून प्रविण लोणकरला अटक केली. आज त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. आरोपी प्रवीण लोणकर कटात सहभागी असल्याचा पोलिसांना संशय आहे.
झिशान सिद्दीकीही टार्गेटवर ?
दरम्यान बाबा सिद्दीक यांच्यासह त्यांचा मुलगा आमदार झीशान सिद्दिकी हा देखील टार्गेटवर असल्याचा पोलिसांना संशय आहे. बाबा सिद्दिकी यांच्यासह झिशानला देखील संपवण्याची सुपारी आरोपींना देण्यात आली, असा पोलिसांना संशय आहे. म्हणूनच दोघेही एकत्र असताना आरोपींनी बाबा सिद्दीकी यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. दोघांना एकत्र मारायचे अन्यथा जो समोर दिसेल त्याला संपवायचे अशी सुपारी मिळाल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे.