Baba Siddiqui : सिद्दीकींचे मारेकरी आणि सूत्रधार यांच्यातील प्रमुख दुवा कोण ?

माजी मंत्री, राजकारणी बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर रोजी गोळया झाडून हत्या करण्यात आली. लॉरेन्स बिश्नोई गँगगने या हत्याकांडाची जबाबदारी घेतली आहे. एका मोठ्या राजकीय नेत्याची हत्या झाल्याने संपूर्ण राज्यात प्रचंड खळबळ माजली असून पोलिसांनी याप्रकरणी तपासाची चक्र वेगाने फिरत आहेत.

Baba Siddiqui : सिद्दीकींचे मारेकरी आणि सूत्रधार यांच्यातील प्रमुख दुवा कोण ?
बाबा सिद्दीकी हत्या
Follow us
| Updated on: Oct 20, 2024 | 10:32 AM

माजी मंत्री, राजकारणी बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर रोजी गोळया झाडून हत्या करण्यात आली. लॉरेन्स बिश्नोई गँगगने या हत्याकांडाची जबाबदारी घेतली आहे. एका मोठ्या राजकीय नेत्याची हत्या झाल्याने संपूर्ण राज्यात प्रचंड खळबळ माजली असून पोलिसांनी याप्रकरणी तपासाची चक्र वेगाने फिरवायला सुरूवात केली आहे. याप्रकरणी आधी चौघांना अटक करण्यात आली होती तर शुक्रवारी पनवेल, डोंबिवली आणि अंबरनाथमधून आणखी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत.

दरम्यान याप्रकरणी नवी अपडेट समोर आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येतील नेमबाज आणि या हत्येचा सूत्रधार यांच्यादरम्यान झिशान अख्तर हा महत्वाचा दुवा असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांकडून अविरत तपास सुरू आहे. त्यासंदर्भात अटक करण्यात आलेल्या आरोपींकडूनही बरीच माहिती मिळत आहेत. पोलिसांच्या सांगण्यानुसार, वॉन्टेड आरोपी मोहम्मद झिशान अख्तर हा गोळीबार करणारे नेमबाज आणि हत्येचा मुख्य सूत्रधार यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून समोर येत आहे. झिशान यानेच सुमारे 10 बँक खाती चालवली आणि संशयितांच्या खात्यात पैसे पाठवले, अशी माहिती देखील समोर आली आहे.

झिशान अख्त्र ( वय 29) आणि ही हत्या लॉरेन्स गँगनेच केल्याची पोस्ट सोशल मीडियावर टाकणारा वाँटेड शुभम लोणकर (वय 23, रा. पुणे) हे देखील या केसमधील आरोपी आहेत. झिशान अख्त्ररनेच शुभम लोणकर याला नेमबाजांचा बंदोबस्त करण्यास सांगितलं होतं. तसेच त्यांना खर्चासाठी 3 ते 4 लाख रुपये पाठवले होते, अशी माहिती समोर आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. ऑगस्ट महिन्यापासून ते ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अख्तरने पैसे पाठवले असाही आरोप आहे. शुक्रवारी अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींपैकी दोघांनी हेरगिरी केली होती. अख्तरने त्यांना पैसेही पाठवले होते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

बाबा सिद्दीकी यांची गेल्या आठवड्यात शनिवारी, (12 ऑक्टोबर) रात्री वांद्रे येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येची जबाबादारी बिश्नोई गँगने स्वीकारली. मात्र पोलीस अजूनही चहूबाजूंनी तपास करत असून या हत्येमागचा हेतू काय याचाही शोध घेत आहेत.

सिद्दीकींच्या हत्येसाठी उत्तर प्रदेशचेच मारेकरी का ?

धर्मराज कश्यप, गुरमेल सिंग आणि शिवकुमार या तिघांनी सिद्दीकींच्या अंगावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मात्र आधी या हत्येची सुपारी मुंबईतील मारेकऱ्यांना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी शुक्रवारी नितीन सप्रे (वय 32)याला डोंबिवलीमधून तर संभाजी पारधी (वय 43) याला पनवेल येथून अटक केली. तर राम कनोजिया (वय 44), प्रदीप ठोंबरे (वय 37) आणि चेतन पारधी (वय 27) या तिघांना अंबरनाथ येथून अटक करण्यात आली.

त्यापैकी राम कनौजिया याने चौकशीत महत्वाचे खुलासे केले. बाबा सिद्दीकी यांना मारण्यासाठी एक कोटी रुपयांची मागणी करण्यात आल्याचा खुलासा कनौजिया याने पोलिसांना सांगितलं. बिश्नोई गँगचा माणूस असलेल्या शुभम लोणकरने सुरूवातीला राम कनौजिया याला तसेच नितीन सप्रे याला सिद्दीकींच्या हत्येचे कंत्राट दिलं होतं. राम कनौजिया हे मूळचे महाराष्ट्रातीलच असून सिद्दीकी यांच्या हत्येनंतर काय प्रतिक्रिया उमटतील याची त्याला कल्पना होती. हे कंत्राट घ्यायची राम कनौजिया याची इच्छा नव्हती, म्हणूनच त्याने हत्येसाठी 1 कोटी या मोठ्या रकमेची मागणी केली होती.

मात्र ती रक्कम खूप मोठी वाटल्याने शुभम लोणकर याने दुसरा मार्ग निवडला. बाबा सिद्दीकी यांची महाराष्ट्रातील प्रतिमा आणि त्यांच्या राजकीय उंचीबद्दल, महत्वाबद्दल उत्तर प्रदेशातील लोकांना फारशी माहिती नसेल, त्यामुळे ते कमी पैशांतही खून करायला तयार होतील असा अंदाज शुभम लोणकरला होता. म्हणूनच त्याने उत्तर प्रदेश मॉड्यूलला सुपारी दिली. अखेर पुण्यात कट रचून, रेकी करून शनिवारी या तिघांनी सिद्दीकी यांची हत्या केली आणि ते पळून गेले.

Non Stop LIVE Update
शिवडीमध्ये कोणाची मशाल धगधगणार? समर्थकांमध्ये रंगतंय पोस्टर वॉर
शिवडीमध्ये कोणाची मशाल धगधगणार? समर्थकांमध्ये रंगतंय पोस्टर वॉर.
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, अन्...
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, अन्....
मनोज जरांगेंनी घेतली मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या प्रवक्त्यांची भेट
मनोज जरांगेंनी घेतली मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या प्रवक्त्यांची भेट.
हे षड्यंत्र...राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार? संजय राऊतांची टीका
हे षड्यंत्र...राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार? संजय राऊतांची टीका.
औकातीपेक्षा जास्त भेटल्यावर..,ठाकरे गटाच्या नेत्याचा शिरसाटांवर निशाणा
औकातीपेक्षा जास्त भेटल्यावर..,ठाकरे गटाच्या नेत्याचा शिरसाटांवर निशाणा.
तिढा सुटला? अमित शाहांनी ठरवला फॉर्म्युला, कोणाच्या वाटेला किती जागा?
तिढा सुटला? अमित शाहांनी ठरवला फॉर्म्युला, कोणाच्या वाटेला किती जागा?.
यंदा विधानसभेत शिंदे-ठाकरे-मनसे अशा 3 'सेनां'मध्ये रंगणार मुकाबला
यंदा विधानसभेत शिंदे-ठाकरे-मनसे अशा 3 'सेनां'मध्ये रंगणार मुकाबला.
विधानसभा निवडणुकीला माणूस आमचा अन् निशाण तुमचं? गटबाजीविरोधीत प्लॅन
विधानसभा निवडणुकीला माणूस आमचा अन् निशाण तुमचं? गटबाजीविरोधीत प्लॅन.
भाजपाचे माजी खासदार सुरेश वाघमारे वर्ध्यातून निवडणूक लढविण्यास इच्छुक
भाजपाचे माजी खासदार सुरेश वाघमारे वर्ध्यातून निवडणूक लढविण्यास इच्छुक.
विदर्भात कॉंग्रेस सांगली पॅटर्न राबविणार ?काय म्हणाले बाळासाहेब थोरात
विदर्भात कॉंग्रेस सांगली पॅटर्न राबविणार ?काय म्हणाले बाळासाहेब थोरात.