Baba Siddiqui Murder : फोटो दाखवला, महिनाभार रेकी मग… पुण्यात असा रचला बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट !
बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यापूर्वी महिभार त्यांची रेकी करण्यात आली होती. गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराकडे मिरची पावडरचा स्प्रे सापडला, तोही सिद्दीकी यांच्यासाठीच होता. बाबा सिद्दीकी पळून जाऊन नयेत म्हणून त्यांच्या तोडांवर मिरची पावडर स्प्रे करण्याचा आदेश देण्यात आला होता
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी 12 ऑक्टोबर रोजी, दसऱ्याच्या दिवशी भररस्त्यात निर्घृण हत्या करण्यात आली. रिक्षातून आलेल्या तिघांनी सिद्दीकींवर गोळीबार केला आणि ते फरार झाले. लीलावती रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच बाबा सिद्दीकींचा मृत्यू झाला. गेल्या अनेक वर्षांत महाराष्ट्रात कोणत्याही रजाकीय नेत्याची अशी हत्या झालेली नाही, त्यामुळे मुंबईसह संपूर् राज्यात खळबळ माजली आहे. कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या गँगने या हत्याकांडाची जबाबदारी स्वीकारली असून आत्तापर्यंत तीन जणांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. धर्मराज कश्यप, गुरमेल सिंग आणि प्रवीण लोणकरला पोलिसांनी अटक केली आहे. तर गोळीबार करणारा मुख्य आरोपी शिवकुमार हा गोळीबारानंतर फरार असून शुभम लोणकर तसेच हत्येचा प्लान आखणार झिशान हाही अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. त्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींना 21 ऑक्टोबर पोलीस कोठडी ठोठावण्यात आली असून त्यांच्या चौकशीतून अनेक महत्वाचे खुलासे होते आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट पुण्यातच रचण्यात आला होता. त्यासाठी शूटर्सना सिद्दीकी यांचा फोटो दाखवण्यात आला होता. या हत्येच्या तपासादरम्यान पुण्यातील प्रवीण लोणकर आणि त्याचा भाऊ शुभम लोणकर हे कटातील मुख्य आरोपी असल्याचे पोलिसांनी उघड केले.
या फरार आरोपींच्या अटकेनंतरच सिद्दीकींच्या हत्येमागील कारण स्पष्ट होऊ शकेल, असे पोलिसांनी सांगितलं. या दोन आरोपींनी शूटर्सना पैसे पुरवणे, हत्येसाठी शस्त्र देणे आणि मीटिंगची सर्व तयारी केली. शुभम लोणकर याच्या डेअरीमध्ये प्रवीण काम करायचा. त्याच डेअरीमध्ये शूटर्सना कामावर ठेवण्यात आला. ते होते धर्मराज कश्यप आणि शिवकुमार गौतम.
शुभमने स्वीकारली सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी
लोणकर बंधू हे धर्मराज कश्यप आणि शिवकुमार यांचे हस्तक होते. पुण्यातच भंगाराचे काम करत असताना धर्मराज आणि शिवकुमार या दोघांची लोणकर बंधूंशी ओळख झाली. त्यानेच धर्मराज आणि शिवकुमार यांचे ब्रेनवॉश करून बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा आदेश दिला होता. शुभम लोणकर हा लॉरेन्सचा भाऊ अनमोल बिश्नोई याच्या संपर्कात होता, असा खुलासा अकोला पोलिसांनी फार पूर्वीच केला होता. शनिवारी रात्री झालेल्या हत्याकांडानंतर दुसऱ्या दिवशी शुभमने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करून बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली.
शुभम लोणकर आणि प्रवीण लोणकर हे दोघे लॉरेन्सची खास माणसं असलेल्या झीशान अख्तर आणि गुरनेल यांच्यामार्फत तिथे गेले होते आणि पंजाब कारागृहात बंद असलेल्या बिश्नोई टोळीच्या खास शूटरला भेटले होते, मात्र त्याचे नाव अद्याप समोर आलेले नाही.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्दीकी गोळीबाराचा कट पंजाबच्या तुरुंगातच रचला गेला होता, ज्यामध्ये शुभम आणि प्रवीणने शिवकुमार आणि धर्मराज यांच्यावर गोळीबार करण्याची जबाबदारी सोपवली होती. मात्र त्या दोघांनाही गुन्ह्यांचा कोणताही अनुभव नव्हता. त्यामुळे प्रोफेशनल गुन्हेगार गुरनेलला हा त्यांचा मुख्य साथीदार बनला. मात्र हे शूटआऊट होण्यापूर्वी शुभम आणि प्रवीण यांना पुढे येऊन नजरेत यायचे नव्हते म्हणून त्यांनी झिशान अख्तरला पुढे करत शूटर्ससोबत ठेवलं.
झिशान अख्तर शूटर्सवर ठेवत होता नजर
या तिन्ही नेमबाजांना मोठ्या रकमेचे आश्वासनही देण्यात आले होते. सुरुवातीला प्रत्येकाला खर्चासाठी 50-50 हजार रुपये दिले होते. या रकमेतून नेमबाजांनी कुर्ल्यात 14 हजार रुपये प्रति महिना भाड्याने एक छोटी खोली घेतली. शुभम आणि प्रवीण पुण्यातील झीशान अख्तरच्या संपर्कात होते आणि झीशान अख्तर मुंबईत या तिन्ही नेमबाजांवर नजर ठेवून होता. दरम्यान, बाबा सिद्दीकी यांची महिनाभर रेकी करण्यात आली. ते कुठे , कधी जाजात, याची नोंद ठेवण्यात आली. आणि त्याच दरम्यान बाबा सिद्दीकी पळून जाऊन नयेत म्हणून त्यांच्यावर मिरची पावडरचा स्प्रे फवारण्याचा निर्णयही घेण्यात आला. त्यानंतर त्यांच्यावर सिद्धू मूसवालाप्रमाणे गोळ्या झाडण्याचा प्लान आखण्यात आला. त्यामुळे मुंबईत लॉरेन्स बिश्नोई गँगची दहशत पसरेला असा हेतू होता. पण हत्याकांडाच्या दिवशी सिद्दीकी यांच्यासमोर तीन शूटर आल्यावर शिवकुमारने घाबरून गोळीबार केला आणि मिरची पावडर स्प्रे करण्याचा प्लान फसला.