Baba Siddique Case : बाबा सिद्दीकींना संपवण्यापूर्वी जंगलात का गेले मारेकरी ? काय होता शूटर्सचा प्लान ?

Baba Siddique Case Update: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकींच्या हत्येला 11 दिवस उलटले आहेत. याप्रकरणात आत्तापर्यंत 10 जणांना अटक करण्यात आली असून रोज नवनवे खुलासे होत आहेत. सिद्दीकी यांच्या हत्येपूर्वी मारेकरी हे खोपोलीजवळच्या जंगलात गेल्याची माहिती आता समोर आली आहे. तिथे जाऊन त्यांनी नेमकं काय केलं ? काय होता मारेकऱ्यांचा प्लान ?

Baba Siddique Case : बाबा सिद्दीकींना संपवण्यापूर्वी जंगलात का गेले मारेकरी ? काय होता शूटर्सचा प्लान ?
सिद्दीकींना मारण्यापूर्वी शूटर्सनी गाठलं जंगलImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Oct 23, 2024 | 11:20 AM

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique Case) यांची 12 ऑक्टोबरच्या रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हत्याकांडाप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत 10 आरोपींना अटक केली आहे. पोलीस त्याची कसून चौकशी करत असून रोज याप्रकरणात काही ना काही नवनवे खुलासे होत असतात. याचदरम्यान पोलिसांच्या तपासात अशी माहिती समोर आली आहे की सिद्दीकी यांच्या हत्येपूर्वी त्याचे मारेकरी हे कर्जत खोपोली रोडवरील एक जंगलात गेले होते. तेथे जाऊन त्यांनी गोळ्या झाडण्याची प्रॅक्टिस केल्याचेही समोर आले आहे.

बाबा सिद्दीकी यांना टार्गेट करण्यापूर्वी त्यांच्या तिनही मारेकऱ्यांनी झाडांवर गोळीबार करत प्रॅक्टिस केली होती, असे एका पोलीस अधिकाऱ्यांने सांगितलं. कर्जत खोपोली रोडवरील धबधब्याजवळील पळसदरी गावाजवळ असलेल्या जंगलात जाऊन मारेकऱ्यांनी त्यांचा सराव केला. सप्टेंबर महिन्यात शूटर्स त्या जंगलात गेले होते, आणि तेथे त्यांनी झाडांवर गोळीबार करत प्रॅक्टिस केल्याची माहिती समोर आली आहे.

फायरिंग प्रॅक्टीससाठी गाठलं जंगल

धर्मराज कश्यप, गुरमेल सिंह आणि शिवकुमार यादव या तिघांनी सिद्दीकींवर गोळीबार केला होता. मात्र त्यापूर्वी सप्टेंबर महिन्यात त्यांनी जंगलात जाऊन प्रॅक्टिस केली. ते तिघेही कुर्ला येथे एक खोली भाड्याने घेऊन रहात होते. फायरिंग प्रॅक्टीससाठी हे तिनही आरोपी कुर्ल्यावरून ट्रेन पकडून लौजी रेल्वे स्टेशनला गेले. तेथून रिक्षा पकडून ते 8 किमी दूर असलेल्या पळसदरी येथे पोहोचले. त्या गावाच्या जवळ असलेल्या जंगलात जाऊन त्यांनी एका झाडावर 5-10 राऊंट फायर करत प्रॅक्टिस केली. आरोपींच्या या खुलाशानंतर मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. यूट्यूबवरील गुन्हेगारी मालिका पाहून शूटींग शिकल्याचेही आरोपींनी पोलिसांना सांगितले होते.

हे भयानक हत्याकांड करण्यासाठी हे आरोपी अवघ्या 2 लाखांत राजी झाले होते, अशी माहिती याआधी समोर आली होती. शूटर्सना हत्येसाठी प्रत्येकी 50 हजार रुपये मिळाले होते. सोशल मीडिया मेसेजिंग ॲप्सद्वारे ते एकमेकांशी बोलत होते अशी माहितीही पूर्वी समोर आली होती.

बाबा सिद्दीकी यांच्या घराची रेकी

याप्रकरणात अटक करण्यात आलेला अन्य आरोपी हरीश याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सिद्दीकी यांना त्यांच्या घराबाहेरच मारण्याचा प्लान होता, त्यासाठी त्यांनी अनेक वेळा त्यांच्या घराची रेकीही केली होती मात्र तिथे त्यांना मारणं शक्य झालं नाही. 12 ऑक्टोबरला त्यांची हत्या करण्यापूर्वी आरोपींनी 28 दिवसांत 5 वेळा सिद्दीकींच्या घराची रेकी केली. त्याआधी तीन महिने त्यांनी सिद्दीकींवर नजर ठेवली होती. कोणालााही संशय येऊ नये म्हणून अनेकवेळा शूटर्स हे शस्त्र न घेताच सिद्दीकींच्या घराजवळ गेले होते, असे आरोपीने सांगितले.

याप्रकरणात आरोपी हरीशने पैशांपासून दुचाकीपर्यंतची व्यवस्था केली होती. तो नेमबाजांसाठी मिडल मॅन म्हणून काम करत होता. शिवकुमार, गुरनेल आणि धरमराज यांना एकूण दोन लाख रुपये देण्यात आले. शुभम लोणकरने त्यांना राहण्या – खाण्यासाठी हे पैसे दिले होते.

बाबा सिद्दीकी कोण हे मारेकऱ्यांना माहीत नव्हतं

आरोपी हरीशला घटनेची संपूर्ण माहिती होती. पुण्यात मारेकऱ्यांना त्यानेच बाबा सिद्दीकी यांचा फोटो दिला होता. तोपर्यंत शूटर्सना बाबा सिद्दीकी कोण होते आणि त्याची प्रोफाइल काय होती हे माहीत नव्हते. हरीश हा 9 वर्षांपासून पुण्यात राहत होता. त्याला मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक गोष्टीची माहिती आहे, मात्र तरीही तो या प्लॅनमध्ये सहभागी झाला. गोळीबार करणाऱ्यांना रोख रकमेसोबत मोबाईल फोनही देण्यात आला.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.