बदलापूर : बदलापुरात बारमध्ये झालेल्या वादातून एका तरुणाची हत्या (Badlapur Murder) करण्यात आली आहे. बदलापूर पश्चिमेच्या हेंद्रेपाड्यातील नाईन सीज बारमध्ये (Nine Sees Bar in Hendrepada, Badlapur) शनिवारी रात्री घटना घडली आहे. टेबलाला धक्का लागल्याच्या वादातून आधी बारमध्ये एकमेकांना मारहाण करण्यात आली. मात्र हा वाद वाढत गेला. नंतर आठ ते दहा जणांनी येऊन केली तीन जणांना लाकडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Video) कैद झाला आहे. या मारहाणीत सिद्धांत उर्फ सन्नी सरोजया तरुणाचा मृत्यू झाला आहे. या तरुणाचं वय 29 वर्ष होतं. या हत्येप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत दोन जणांना ताब्यात घेतलंय. तर इतरांचा शोध सुरू आहे. बारमध्ये झालेल्या हत्याकांडानं बदलापुरातील परिसर हादरुन गेलाय.
सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये बारमध्ये दोघांवर जोरदार राडा झाला. यामध्ये टेबलाला धक्का लागल्याच्या वादातून एकानं दुसऱ्या टेबलावर बसलेल्या तरुणाला जाब विचारला. त्यांच्यात बाचाबाची झाली. यानंतर एका माणसानं टेबलावर बसलेल्या माणसाच्या थेट कानशिलात लगावली. यानंतर टेबलावर बसलेला तरुणही संपातला. यावेळी दोघांमध्येही घमासान झाल्याचं दिसून आलंय.
बारमध्ये लागलेल्या सीसीटीव्ही सोबतच बारच्या बाहेरचं सीसीटीव्हीही पोलिसांच्या हाती लागलं आहे. या व्हिडीओमध्ये बारच्या बाहेर तणावपूर्ण वातावरणात घडामोडी दिसून आल्या आहेत. तसंच आणखी एका सीसीटीव्हीमध्ये एक तरुण एक दरवाजावर हल्ला करत असल्याचं दिसतंय.
Murder | CCTV | बदलापुरात बारमध्ये भांडण, वाद विकोपाला जाऊन तरुणाची हत्या, संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद#crime #Badlapur #cctvfootage #maharashtranews pic.twitter.com/qBWPLrKdTt
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 10, 2022
या हत्येप्रकरणी पोलिसांकडून आता अधिक तपास केला जातो आहे. शुल्लक कारणावरुन झालेल्या या हत्याकांडामुळे बदलापुरातील संपूर्ण परिसर हादरुन गेला आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतलं असून इतरांचा शोध सुरु आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं पोलिसांकडून आता हत्येचा उलगडा करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
वाह रे चोरा.. आधी हात जोडले अन् मग देवाच्या दानपेटीवर डल्ला, नांदेडच्या मंदिरातली चोरी CCTV त कैद
चौथीतल्या विद्यार्थिनीसोबत शिक्षकाकडून गैर कृत्य; पालकांनी चोप दिल्यानंतर गुन्हा दाखल…बीडमधला प्रकार