महिलेच्या हत्येने बदलापुरात खळबळ, पतीनेच पत्नीला संपवल्याचा संशय

बदलापूर पोलिसांना शिरगाव परिसरात काही अघटित घडल्याची माहिती मिळाली. पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि दरवाजा तोडून पाहिले तर समोरील दृश्य पाहून शॉकच झाले.

महिलेच्या हत्येने बदलापुरात खळबळ, पतीनेच पत्नीला संपवल्याचा संशय
शिरगाव परिसरात महिलेची हत्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 19, 2023 | 4:36 PM

बदलापूर / निनाद करमरकर : बदलापूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या हत्येच्या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. महिलेची जीवघेणा हल्ला करत हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. बदलापूर पूर्वेतील राऊत आर्केडमध्ये हा प्रकार घडला असून, यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली आहे. राजश्री गणेश भोसले असे मयत महिलेचे नाव आहे. राजश्रीचा पती फरार आहे. यामुळे पतीनेच पत्नीची हत्या केल्याचा संशय असून, पोलीस पतीचा शोध घेत आहेत. पतीला सापडल्यानंतरच सर्व प्रकरणाचा उलगडा होईल.

दुपारच्या सुमारास महिला घरात मृतावस्थेत आढळली

बदलापूर पूर्वेच्या शिरगाव परिसरातील राऊत चौकात राऊत आर्केड नावाची इमारत आहे. या इमारतीत राजश्री गणेश भोसले ही 35 वर्षीय महिला पती आणि मुलासह वास्तव्याला होती. आज दुपारच्या सुमारास ही महिला घरात मृतावस्थेत आढळून आली. पोलिसांना भोसले यांच्या घरात काही अघटित घडल्याची माहिती मिळताच बदलापूर पूर्व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फ्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता आत महिलेची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं.

पोलिसांकडून अधिक तपास सुरु

पोलिसांनी पंचनामा करून महिलेचा मृतदेह ताब्यात घेत बदलापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. दरम्यान, राजश्रीची हत्या ही तिच्या पतीने गणेश भोसले यानेच केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, त्या दृष्टीने पोलिसांचा सध्या तपास सुरू आहे. गणेशचा फोनही बंद येत आहे. ही हत्या का करण्यात आली? याचं कारण मात्र अद्यापही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. बदलापूर पूर्व पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा

Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....