रेखा जरे हत्याकांड | अटकेपासून वाचण्यासाठी बाळ बोठेची तगमग
जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी बाळ बोठेने हजर राहावं अशी मागणी अॅड सतीश पाटील यांनी केली.
अहमदनगर : रेखा जरे हत्याकांडातील (Rekha Jare Murder Case) मुख्य आरोपी बाळ बोठे (Bala Bothe) आज (14 डिसेंबर) कोर्टासमोर हजर राहतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण बाळ बोठेच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होत आहे. या सुनावणीला बाळ बोठेने हजर राहावं, अशी मागणी करणारा अर्ज पोलिसांकडून न्यायालयाला देण्यात आला. बाळ बोठे सध्या फरार आहे, त्याला पकडण्यासाठी पोलीस सर्व प्रयत्न करत आहेत. मात्र तो काही पोलिसांच्या हाती लागत नाही. मात्र दुसऱ्या बाजूला त्याने वकीलामार्फत न्यायालयात लढाई सुरु केली आहे. (Bala Bothe attempt for Bail in Rekha Jare Murder Case)
अटकेपासून वाचण्यासाठी बाळ बोठेची तगमग
या प्रकरणापासून सुटण्यासाठी बाळ बोठे शक्य ते प्रयत्न करत आहे. बाळ बोठेनं अॅड. महेश तवलेंच्या मदतीने कोर्टाकडे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. यावर 11 डिसेंबरला सुनावणी झाली. मात्र दोन्ही पक्षांकडून अधिकची वेळ मागण्यात आली. त्यामुळे ही सुनावणी आज म्हणजेच 14 डिसेंबरला होणार आहे.
बाळ बोठेला पकडण्यासाठी पोलिसांकडून कायद्याचाच आधार!
दरम्यान, फरार बाळ बोठेला जाळ्यात अडकवण्यासाठी पोलिसांनी कायद्याचाच आधार घेतला आहे. जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी बाळ बोठेने हजर राहावं अशी मागणी अॅड सतीश पाटील यांनी केली. पोलिसांनी दिलेला हा अर्ज पाटील यांनी न्यायालयासमोर सादर केला. त्यामुळे न्यायालय आता या अर्जावर काय सांगतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
रेखा जरेच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण
दरम्यान रेखा जरेंच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात आलं आहे. रेखा जरेंचा मुलगा कुणाल जरेनं बाळ बोठेपासून कुटुंबाला धोका असल्याचा अर्ज पोलिसांकडे केला आणि पोलीस संरक्षणाची मागणी केली. यानंतर जरे कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात आलं आहे. शिवाय 11 डिसेंबरला चारही आरोपींची ओळख परेडही झाली. ज्यात कुणाल जरेने हत्येच्या ठिकाणी असलेल्या आरोपींना ओळखलं. (Bala Bothe attempt for Bail in Rekha Jare Murder Case)
नेमकं प्रकरण काय?
रेखा भाऊसाहेब जरे यांची 30 नोव्हेंबरला हत्या झाली होती. रेखा जरे कुटुंबियांसह स्वतःच्या गाडीने सोमवारी संध्याकाळी पुण्याहून अहमदनगरकडे येत होत्या. यावेळी त्यांच्यासोबत मुलगा आणि त्यांची आईही होती. कारची काच बाईकला लागल्याचं सांगत दोन दुचाकीस्वारांनी जरे मायलेकाशी वाद घातला आणि रेखा जरे यांच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करत त्यांची हत्या करण्यात आली.
संबंधित बातम्या :
जातेगावच्या घाटात हिरो झालेला बाळा बोठे, जातेगावच्या घाटातच व्हिलन कसा झाला?
रेखा जरे हत्याकांड : बाळ बोठेच्या हनी ट्रॅपचं ‘मटेरियल’ वाचलंत?
(Bala Bothe attempt for Bail in Rekha Jare Murder Case)