हॉटेल स्टाफ, पोलिस आणि टॅक्सी ड्रायव्हर… तिघांमुळे मारेकरी आईचा प्लान फसला; ट्रॉली बॅगमध्ये मृतदेह ठेवून ती..

मुलाची हत्या केल्यानंतर सूचना हॉटेलच्या बाहेर ट्रॉली बॅग घेऊन उभी होती. कर्मचाऱ्यांनी तिला विमानाने जाण्याचा सल्ला दिला, पण ती टॅक्सीने जाण्यावर ठाम होती. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी टॅक्सीची व्यवस्था केली. तिच्या बेपत्ता मुलाची माहिती घेण्यासाठी पोलिसांनी टॅक्सी चालकाला फोन केला आणि...

हॉटेल स्टाफ, पोलिस आणि टॅक्सी ड्रायव्हर... तिघांमुळे मारेकरी आईचा प्लान फसला; ट्रॉली बॅगमध्ये मृतदेह ठेवून ती..
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jan 10, 2024 | 9:42 AM

पणजी | 10 जानेवारी 2024 : हॉटेल स्टाफ, पोलिस आणि टॅक्सी ड्रायव्हर… या तिघांमुळे एका मारेकरी आईचा प्लान अयशस्वी ठरला. एका स्टार्टअपची फाऊंडर आणि सीईओ असलेल्या सूचना सेठने तिच्या अवघ्या चार वर्षांच्या मुलाची हत्या केली. सोमवारी गोव्यात हे प्रकरण उघडकीस आलं आणि एकच खळबळ माजली. मूळची बंगळुरूमधील असलेल्या सूचनाने गोव्यात येऊन मुलाचं आयुष्य संपवलं. मुलाचा मृतदेह बॅगेत भरुन ती टॅक्सीने बेंगळुरूच्या दिशेने जात असताना तिला चित्रदुर्ग येथे पोलिसांनी अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, सूचना आणि तिच्या पतीच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होती. आणि मुलाच्या कस्टडीसाठीही दोघांमध्ये लढाई सुरू होती.

पतीची मुलाशी भेट होऊ नये, म्हणून गोव्यात मुलाची हत्या करून ती पळून जाण्याच्या तयारीत होती. पण पोलिस आणि टॅक्सी ड्रायव्हरमध्ये झालेल्या संभाषणामुळे ती थेट तुरूंगातच पोहोचली. सध्या पोलिस तिची कसून चौकशी करत आहेत. गोव्यातील हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी त्या मारेकरी सीईओ महिलेला कसं पकडून दिलं ? चला जाणू घेऊया.

नॉर्थ गोव्याचे एसपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 39 वर्षीय सूचना सेठ या एका स्टार्टअपच्या संस्थापक आणि सीईओ असून ती मूळची बंगळुरू येथील आहे. ती पतीपासून विभक्त झाली होती. तिच्यासोबत तिचा चार वर्षांचा मुलगा रहात होता. एके दिवशी सूचना मुलासह गोव्याला आली आणि एका हॉटलेमध्ये थांबली. पण परत जाताना ती टॅक्सीत बसली तेव्हा तिच्यासोबत मुलगा नव्हता. तिच्याकडे फक्त एक ट्रॉली बॅग होती.

हे सुद्धा वाचा

विमानऐवजी टॅक्सीने जाण्याचा घेतला निर्णय

सूचना सेठने गोव्यातील कँडोलिम हॉटेलमध्ये एक रूम ( ४०४) बूक केली होती. चेक इन करताना तिने बंगळुरूचा पत्ता दिला होता. मात्र बंगळुरूला परत जाताना ती टॅक्सीची वाट बघत होती. तुम्ही विमानाने गेलात तर स्वस्त पडेल असे हॉटेल कर्मचाऱ्यांनी तिला सांगितलं पण ती टॅक्सीनेच जाण्याच्या निर्णयावर ठाम होती. अखेर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी तिच्यासाठी टॅक्सीची व्यवस्था केली.

रूममध्ये सापडले रक्ताचे डाग

सुचना सेठने चेकआऊट केल्यानंतर हॉटेलचे सफाई कर्मचारी साफसफाईसाठी खोलीत गेले. मात्र तेथील दृश्य पाहून कर्मचाऱ्यांना धक्काच बसला. कारण, त्या खोलीमध्ये रक्ताचे डाग होते. त्यांनी तत्काळ हॉटेलच्या मॅनेजरला या घटनेची माहिती दिली. त्याने लगेचच पोलिसांना याबद्दल कळवलं. या घटनेची माहिती मिळताचा पोलिस लगेच तिथे दाखल झाले आणि त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. हॉटेलमध्ये मुलासह आलेली सूचना परत निघाली, तेव्हा तिच्यासोबत तिचा मुलगा नव्हता, हे पोलिसांच्या लक्षात आले.

पोलिसांना दिली खोटी माहिती

सूचना ही टॅक्सीने गेल्याचे हॉटेलच्या कर्मचार्‍यांनी सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले. मात्र तिच्यासोबत तिचा मुलगा नव्हता, पण एक ट्रॉली बॅग नक्कीच होती. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी टॅक्सीची व्यवस्था केलेली असल्याने तिचा नंबरही उपलब्ध होता. इन्स्पेक्टर नाईक यांनी घाईघाईने टॅक्सी ड्रायव्हरला फोन केला आणि सूचना हिच्याकडे फोन देण्यास सांगितले. फोनवरून पोलिसांनी तिला मुलाबाबत विचारलं असता, आपण मुलाला फातोर्डा (गोवा) येथे मित्राच्या घरी सोडलं असं तिने सांगितलं. पोलिसांनी तिच्याकडे पत्ता मागितला, पण तो खोटा निघाला.

टॅक्सी ड्रायव्हरने पोलिस स्टेशनच्या दिशेने वळवली कार

त्यानंतर इन्स्पेक्टर नाईक यांनी पुन्हा टॅक्सी ड्रायव्हरला फोन केला आणि सूचनाला काही समजू नये म्हणून ते टॅक्सी ड्रायव्हरशी स्थानिक कोकणी भाषेत बोलू लागले. इ. नाईक यांनी त्या ड्रायव्हरला जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये जाण्यास सांगितले. ड्रायव्हरने त्यांचं म्हणणं ऐकलं आणि टॅक्सी घेऊन सरळ पोलिस स्टेशनला गेला. तिथे गेल्यावर (हत्येचा) सर्व प्रकार उघडकीस आला आणि पोलिसांनी सूचना सेठ हिला अटक केली. पोलिसांनी तिची ट्रॉली बॅग चेक केली असता, त्यामध्ये (तिच्या) मुलाचा मृतदेह आढळला.

भाषेत बोलले, त्यामुळे माहिती समजू नये. इन्स्पेक्टर नाईकांनी त्याला थोडक्यात सांगितले की जवळच्या पोलीस ठाण्यात जा. इन्स्पेक्टर नाईक यांचे म्हणणे ऐकून ड्रायव्हरने तेच केले आणि गाडी पोलिस ठाण्यात नेली. अशाप्रकारे सुचना सेठला पोलिसांनी अटक केली. माहितीच्या ट्रॉली बॅगची तपासणी केली असता त्यात मुलाचा मृतदेह आढळून आला.

पोलिस तपासात गुंतले

आरोपी आई सुचना सेठ हिला अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले. हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेजही जप्त करण्यात आले असून फॉरेन्सिक टीम सुगावा गोळा करत आहे. मुलाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. सूचनाच्या कॉल डिटेल्सचीही चौकशी सुरू आहे. मात्र आतापर्यंत एकही शस्त्र जप्त करण्यात आलेले नाही. आरोपी सुचना सेठ ही बंगालची रहिवासी असून तिचे लग्न केरळमधील एका व्यक्तीशी झाले होते. सुचना बेंगळुरूमधील आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनीच्या सीईओ आहेत. तिचा विभक्त झालेला पती सध्या कामानिमित्त इंडोनेशियात आहे. त्याला घडलेल्या प्रकाराची माहिती देण्यात आली असून, त्याला भारतात येण्यास सांगितले आहे.

मुलाच्या ताब्यावरून वाद

सुचना सेठचा 2010 मध्ये वेंकट रमनशी विवाह झाला होता. नऊ वर्षांनी त्यांना एक मुलगा झाला. पण एका वर्षानंतर 2020 मध्ये या दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. मुलाच्या कस्टडीसाठी दोघांनीही कोर्टात धाव घेतली होती. पतीची मुलाशी भेट होू नये, त्याला त्याचा ताबा मिळू नये अशी सूचनाची इच्छा होती. त्यामुळेच तिने मुलाचा काटा काढला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.