खंडणी वसूल करणाऱ्या टोळीचं बेकायदा पिस्तूल रॅकेट समोर, 10 काडतुसांसह सात पिस्तूल हस्तगत

सध्या पोलीस यंत्रणा याच्या मुळापर्यंत जाण्यासाठी कामाला लागली आहे. (Baramati police seized 7 pistols and 10 cartridges)

खंडणी वसूल करणाऱ्या टोळीचं बेकायदा पिस्तूल रॅकेट समोर, 10 काडतुसांसह सात पिस्तूल हस्तगत
Follow us
| Updated on: Jan 28, 2021 | 12:00 AM

बारामती : हॉटेलचालकास धमकावून त्यांच्याकडून खंडणी वसूल करणाऱ्या टोळीचं बेकायदा पिस्तूल रॅकेट उघडकीस आलं आहे. बारामती तालुका पोलिसांनी तब्बल दहा काडतुसांसह सात पिस्तूल हस्तगत केले आहेत. पुणे जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. सध्या पोलीस यंत्रणा याच्या मुळापर्यंत जाण्यासाठी कामाला लागली आहे. (Baramati police seized 7 pistols and 10 cartridges)

बारामतीतील एका हॉटेल मालकाला मारहाण करून जबरदस्तीने पैसे चोरून नेल्याप्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात दाखल होता. यातील फरार आरोपी आणि त्याचे साथीदार हे बेकायदा पिस्तूल विक्री करण्यासाठी एमआयडीसी परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. यावेळी आदिनाथ ईश्वर गिरमे हा त्यांच्या अॅक्टिव्हा दुचाकीवरून आल्यानंतर पोलिसांनी त्याची झडती घेतली. त्यामध्ये त्याच्याकडे एक पिस्तूल आणि 2 काडतुसे आढळली. त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्याच्या साथीदारांना ताब्यात घेण्यात आलं. त्यांच्याकडून 6 पिस्तूल आणि 8 काडतुसे हस्तगत करण्यात आली.

या कारवाईमध्ये एकूण सात पिस्तूल आणि दहा काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहेत. तर आदिनाथ गिरमे याच्यासह विजय रामदास कराड, अमोल रमेश गर्जे आणि अन्य दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर बेकायदा शस्त्र बाळगणे, खंडणी वसूल करणे इत्यादी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ही सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश लंगूटे, कर्मचारी दादा ठोंबरे, नंदू जाधव, राहुल पांढरे, विजय वाघमोडे, मंगेश कांबळे, विनोद लोखंडे, दत्तात्रय मदने, रणजीत मुळीक यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. संपूर्ण रॅकेटच्या मुळाशी जाऊन त्यातील मास्टरमाईंड उघड करण्याचं पोलिसांसमोर आव्हान उभं ठाकलं आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. त्यासाठी पथकही रवाना करणार असल्याचेही उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी सांगितलं आहे.  (Baramati police seized 7 pistols and 10 cartridges)

संबंधित बातम्या : 

भोसरी पोलिसांची मोठी कारवाई, 24 पिस्तूल आणि 38 जिवंत काडतूस जप्त

अंध महिलेला एक दिवसाच्या पोलीस आयुक्ताचा मान, पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून अनोख्या पद्धतीने प्रजासत्ताक दिन साजरा

दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.