Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण; आरोपीविरोधात गुन्हा दाखल

नांदेड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वीजबिलाची वसुली करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. नांदेड जिल्ह्यातील सायाळ गावातून हा प्रकार समोर आला आहे. महावितरणचे वरिष्ट तंत्रज्ञ मोहमद जावेद यांना मारहाण करण्यात आली आहे.

वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण; आरोपीविरोधात गुन्हा दाखल
Follow us
| Updated on: Jan 30, 2022 | 7:15 PM

नांदेड : नांदेड जिल्ह्यातून (Nanded) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वीजबिलाची (electricity bill) वसुली करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला ( MSEDCL workers) मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. नांदेड जिल्ह्यातील सायाळ गावातून हा प्रकार समोर आला आहे. महावितरणचे वरिष्ट तंत्रज्ञ मोहमद जावेद यांना मारहाण करण्यात आली आहे. वीजबिलाच्या वसुलीसाठी आपण सायाळमध्ये गेलो असता आपल्याला मारहाण झाल्याचा आरोप जावेद यांनी केला आहे. या प्रकरणी बालाजी जामगे यांच्याविरोधात लिंबगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहमद जावेद यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे जामगे यांच्याविरोधात मारहाण करणे, तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान गुन्हा दाखल होताच या प्रकणातील आरोपी फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. प्रकरणाचा अधिक तपाससुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

वीजबिल वसुलीवरून वाद

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, सध्या महावितरणकडून थकीत वीजबिलाची वसुली सुरू आहे. महावितरणचे कर्मचारी गावागावत जावून वीजबिल वसुली करत आहेत. जे वीजबिल भरणार नाहीत अशांचा वीजपुरवठा देखील खंडीत केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर महावितरणचे वरिष्ट तंत्रज्ञ मोहमद जावेद हे जिल्ह्यातील सायाळमध्ये गेले होते. वीजबिलावरून बालाजी जामगे आणि मोहमद जावेद यांच्यामध्ये वाद झाला. यावेळी जामगे यांनी आपल्याला मारहाण केल्याची तक्रार जावेद यांनी केली आहे.

गुन्हा दाखल

दरम्यान जावेद यांच्या तक्रारीवरून बालाजी जामगे यांच्याविरोधात मारहाण करणे, तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच जामगे हे  फरार झाले असून, लिंबगाव पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अनेक गावांमध्ये सध्या महावितरणकडून थकीत वीजबिलाची वसुली मोहीम सुरू आहे. ग्रामीण भागात जावून महावितरणचे कर्मचारी वीजबिल वसुल करत आहेत. जे वीजबिल भरणार नाहीत अशा ग्राहकांचा वीजपुरवठा देखील खंडीत करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

Terrible accident| पुण्यातील जुन्नर रोडवर भरधाव स्कार्पिओवरील चालकाचा ताबा सुटला अन जे झालं ते ….

हैवानतेचा कळस! नराधम बापासह भावाचाही बलात्कार! आईची डोळेझाक, कल्याणमधील हादरवणारी घटना

‘कोणाला टाकून पैसे जमा करू लागले तुम्ही’ Viral झालेल्या Call Recordingमधील पोलिसांचं संपूर्ण संभाषण

पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.
पहलगाम घटनेनंतर काही तासातच बारामुल्लातही दहशतवादी कारवाया
पहलगाम घटनेनंतर काही तासातच बारामुल्लातही दहशतवादी कारवाया.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याचा पहिला फोटो
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याचा पहिला फोटो.
डोंबिवलीवर शोककळा; संजय लेले यांचं कुटुंब काश्मीरकडे रवाना
डोंबिवलीवर शोककळा; संजय लेले यांचं कुटुंब काश्मीरकडे रवाना.
नागपूरचे तिलक रूपचंदानी पहलगाममध्ये फसले; हल्ल्यात पत्नी जखमी
नागपूरचे तिलक रूपचंदानी पहलगाममध्ये फसले; हल्ल्यात पत्नी जखमी.
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...